जिवंत नागाची पूजा ही ‘नाग देवतेसाठी’ हानिकारक pudhari photo
रायगड

Live snake rituals : जिवंत नागाची पूजा ही ‘नाग देवतेसाठी’ हानिकारक

बंदी घातलेल्या प्रथेला पुनरुज्जीवित करू नका; तज्ज्ञांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

उरण : नाग पंचमीच्या दिवशी राज्यात बंदी घातलेल्या जिवंत नागाची पूजा पुन्हा सुरू करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध पर्यावरणवादी संतप्त झाले आहेत. जिवंत नाग पूजा उत्सव पुन्हा सुरू करण्याच्या मागणीनंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी राज्य विधानसभेत आश्वासन दिले होते की ते केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे जिवंत नागाची पूजा करण्याचा मुद्दा उपस्थित करणार आहेत.

शासनाच्या या निर्णयाला विरोध करताना, प्रसिद्ध हर्पेटोलॉजिस्ट मृगांक प्रभू म्हणाले की, वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची-1 अंतर्गत संरक्षित प्रजाती असलेल्या नागाला हानी पोहोचवणारी ही प्रथा पुन्हा सुरू करण्याची गरज नाही. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रथेविरुद्ध निकाल दिल्यानंतर आणि आदिवासी समुदायाला साप पकडण्यापासून रोखण्यासाठी आणि त्यांच्या विधींचे पालन करण्याचे निरुपद्रवी मार्ग शोधण्याचे निर्देश दिल्यानंतर ही प्रथा लोप पावत चालली आहे, असे प्रभु यांनी सांगितले.

नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी निदर्शनास आणून दिले की सरकारने हे लक्षात घेतले पाहिजे की साप दूध पित नाहीत. तरीही, सर्पमित्रांचे टोळके त्यांच्या दातांचे आणि विष ग्रंथी काढून टाकत असत, नागांना काही दिवस उपाशी ठेवत असत आणि नंतर त्यांना भक्तांनी अर्पण केलेले दूध चाटण्यास भाग पाडत असत.

ही एक अतिशय क्रूर प्रथा होती ज्यामुळे सापांना त्रास होत होता. त्यांच्यासाठी दूध विषासारखे असते, असे कुमार यांनी निरीक्षण नोंदवले. ज्या सापांची ते इतक्या भक्तीने पूजा करतात त्यांच्याशी क्रूर वागू नये यासाठी लोकांना मोठ्या प्रमाणात शिक्षित करण्याची गरज आहे.

नागपंचमी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएल्टी ऑफ अ‍ॅनिमल्स अत्यंत दयनीय स्थितीत असलेल्या शेकडो सापांना वाचवत असतात. अनैसर्गिक दूध पाजल्यामुळे आणि उपासमारीमुळे निर्जलीकरण झाल्यामुळे साप न्यूमोनियाचे बळी पडत असत. त्यामुळे ग्रामीण भागात सर्पांबद्दल जनजागृती वाढविणे अत्यंत गरजेचे आहे.

2006 मध्ये घातलेली बंदी ही गरीब प्राण्यांसाठी एक वरदान होती, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. नाग देवतेच्या मूर्तींची पूजा करणे ही पूजनीय नागांना इजा करण्यापेक्षा खूप चांगली प्रथा आहे, असल्याचे मत पर्यावरणवाद्यांचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT