निसर्गाशी नाते सांगणार्या शेतकर्यांना यंदाही पावसाने चांगलेच रंग दाखविल्याने शेतकर्यांची पुरती वाट लागली आहे.यंदा पावसाला मे महिन्यातच सुरुवात झाल्याने पेरणी वाया जाण्याच्या भीतने शेतकर्यांनी सुरुवातीला भात पेरणी केली नाही. त्यानंतर पाऊस सारखाच कोसळत राहिला. त्यामुळे अनेक ठिकाणच्या शेतकर्यांनी जूनच्या पाच-सहा तारखेपासून पेरणीला सुरुवात केली. मात्र पावसाचा वेग वाढतच राहिला. त्यामुळे भातरोपे तयार न होताच भात कुजून गेले. महागडी बियाणे शेतकर्यांनी खरेदी केली होती. ही बियाणे शेतकर्यांनी भातरोपे तयार करण्यासाठी वापरली. मात्र बियाण्याचे भातच शेतात कुजून गेल्याने, निसर्गाशी नाते सांगणार्या शेतकर्यांवर मोठे संकट ओढावले आहे.
शेतकर्यांनी पुन्हा एक वार दुबार भात पेरणी केली. मात्र पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्यामुळे तेही भात बियाणे शेतातल्या शेतात कुजून गेले आहे. आता भात बियाणे केंद्रावर सुद्धा मिळत नसल्यामुळे तसेच घरातील उरल्या सुरल्या भात बियाण्यांचा देखील शेतकर्यांनी वापर केल्यामुळे शेतकर्यांना बियाण्याच्या भाताची पंचायत झाली आहे.
विशेषता: धुवाधार कोसळणार्या पावसाने या भात बियाणाला उगविण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे तालुक्याबरोबर जिल्ह्यातील शेतकर्यांवर शेती ओसाड ठेवण्याची वेळ आली आहे. खरीप हंगामातील भात पेरणीला जून महिन्यातच खरी सुरुवात करता आली नाही. आणि ज्या शेतकर्यांनी बियाणे पेरले होते. त्या शेतकर्यांचे बियाणेच पुरते कुजून गेले आहे.
सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा राहिल्याने रोपांच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाला असून काही ठिकाणी उगवलेली रोपे फार कमकुवत झाल्याने नुकसान झाले आहे.कृषी मित्र शेतकरी प्रफुल्ल खारपाटील
खरीप हंगामातील भात पेरणी हवी तशी न झाल्यामुळे भातरोपे उगवलीच नाही. धूळपेरणीला संधी न मिळाल्यामुळे जी उन्हाची उब महत्त्वाची आहे. ती उब शेतात साचलेल्या पाण्यामुळे मिळाली नाही. त्यामुळे भात रोपांची अवस्था फार बिकट आहे.रमेश फोफेरकर शेतकरी ,उरण