महाड ः महाड-पंढरपूर रस्त्यावर राजेवाडी गावाजवळ बोलेरो पिकअप वाहनातून खैराची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनासह आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. वनखात्याने केलेल्या कारवाईत खैराची अवैध वाहतूक उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई व राष्ट्रीय महामार्गावरील राजेवाडी गावाजवळील उड्डाण पुलाजवळ वन खात्याचे कर्मचारी गस्त करीत असताना एमएच 23 डब्ल्यू 2778 या या क्रमांकाच्या पिक अप वाहन संशयास्पद आढळल्याने त्याची तपासणी केली असता खैराचे सोलिव नग 9 घनमीटर 0.0069 व गाडीच्या हौदामध्ये खैर सालपा वजन अंदाजे 500. ग्राम आढळून आल्याने या खैराच्या मालाचे वाहतूक केल्या बाबत संदीप उत्तम माने वाहन चालक मालक राहणार कारेगव्हाण तालुका बीड जिल्हा बीड या आरोपीस अटक केली आहे.
आरोपीवरती भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) फ 41/ 2ब नुसार कारवाई केली असून वाहनाच्या मुद्देमानाचा अंदाजे सहा लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी चार दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. याबाबत उपवनसंरक्षक रोहा व सहाय्यक वन संरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाने वनक्षेत्रपाल महाड व वनपरिक्षेत्राधिकारी आशिष पाटील यांनी पुढील कारवाई केली.