अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचार्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. त्यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना दरमहा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कुटुंबांची ओढाताण होत असल्याने आरोग्य कर्मचार्यांमध्ये नाराजी आहे. पगार वेळेवर व्हावेत यासाठी कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांना निवेदन दिले आहे.
आरोग्य विभागांतर्गत कार्यरत सर्व आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ सहाय्यक, स्त्री परीचर, सफाई कामगार, शिपाई व इतर कर्मचारी यांचे वेतन मागील काही महिन्यांपासून वेळेत होत नाही.
ग्रामविकास विभागाने यासंदर्भात दोन वर्षांपूर्वीच एक पत्र सर्व जिल्हा परीषदांना जारी केले आहे. दरमहा 5 तारखेच्या आत सर्व कर्मचारयांचा पगार झाला पाहिजे अशा शासनाच्या सुचना अंसताना देखील वेतन वेळेत होत नाही. पर्यायाने ऑनलाईनच्या प्रणालीवर सी बील स्कोअरवर याचा परीणाम होत असून तो खराब होत असल्याची कर्मचारयांची तक्रार आहे. कोणत्याही बँकेत काहीही चुक नसताना कर्मचारी वर्गाला नाहक आर्थिक नुकसान सहन करावे लागते. कर्जप्रकरणे मंजूर होताना अडचणी येत आहेत.
वेतनाला सातत्याने विलंब होत असल्याने कर्मचा-यांना विविध समस्यांना तोंड दयावे लागते. गृहकर्ज, मुलांचे शिक्षण, घरभाडे, कुटंबियांचा औषधोपचार, बाहेरगावी शिक्षण घेत असलेल्या पाल्यांना पैसे पाठविता न येणे या सर्व बाबींमुळे वेतन वेळेत न झाल्याने जिल्हा परिषद कर्मचा-यांना नाहक मनस्ताप व आर्थिक कुचंबणा होत आहे.
शासनाकडून वेतनासाठी वेळेत निधी उपलब्ध होतो. जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी योनी वेतन वेळेवर अदा करण्याच्या सूचना वारंवार दिल्या आहेत तरीसुध्दा या महिन्याचे वेतन अदयाप पर्यंत झालेले नाही. काही अधिकारी आणि कर्मचारयांच्या दिरंगाईमुळे वेतनास विलंब होत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. वेतनास विलंब करणा-या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी तसेच यापुढील वेतनास कोणताही विलंब होणार नाही, असे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांना निवेदन देण्यात आले आहे.
वेतनाला सातत्याने विलंब होत असल्याने कर्मचा-यांना विविध समस्यांना तोंड दयावे लागते. गृहकर्ज, मुलांचे शिक्षण, घरभाडे, कुटंबियांचा औषधोपचार, बाहेरगावी शिक्षण घेत असलेल्या पाल्यांना पैसे पाठविता न येणे या सर्व बाबींमुळे वेतन वेळेत न झाल्याने जिल्हा परिषद कर्मचार्यांना नाहक मनस्ताप व आर्थिक कुचंबणा होत आहे.