हाडांचा ठिसूळपणा टाळण्यासाठी आयुर्वेद प्रभावी  pudhari photo
रायगड

Prof. Rabinarayan Acharya : हाडांचा ठिसूळपणा टाळण्यासाठी आयुर्वेद प्रभावी

केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषद महासंचालक प्रा. रबीनारायण आचार्य यांचा विश्वास

पुढारी वृत्तसेवा

रायगड ः ऑस्टिओपोरोसिस अर्थात हाडांचा ठिसुळ हे सार्वजनिक आरोग्यासमोर वाढते आव्हान आहे, मात्र, आयुर्वेदाच्या प्रतिबंधात्मक आणि पुनर्संचयित ज्ञानाद्वारे त्याचा प्रभावी मुकाबला करणे शक्य आहे. अस्थि सौषिर्य ही शास्त्रीय संकल्पना हाडांच्या ठिसूळपणाच्या आधुनिक समजुतीशी मिळतीजुळती आहे. आयुर्वेदाचा लवकर सहभाग, संतुलित आहार आणि अनुकूल जीवनशैलीवर असलेला भर हा मजबूत हाडे आणि निरोगी वृद्धत्वासाठी एक नैसर्गिक मार्ग दाखवेल असा विश्वास केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषदेचे महासंचालक प्रा. रबीनारायण आचार्य यांनी व्यक्त केला आहे.

19 ऑक्टोबर रोजी जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिनाच्या निमीत्ताने हाडांच्या आरोग्याबद्दल आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या परिस्थितीसाठी आयुर्वेद कसे शाश्वत, प्रतिबंधात्मक आणि पुनर्स्थापनेचे उपाय करू शकतो, याबद्दल जागरूकता वाढवण्याकरिताच्या परिसंवादात महासंचालक प्रा. रबीनारायण आचार्य यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषदेने ऑस्टिओपोरोसिसच्या व्यवस्थापनात लक्ष गुग्गुळ आणि प्रवाळ पिष्टी यांसारख्या आयुर्वेदिक औषधांची वैधता तपासण्यासाठी आणि स्नायूअस्थिजन्य विकारांमध्ये आयुर्वेदिक सहभागाच्या भूमिकेवर ठोस पुरावे निर्माण करण्यासाठी वैज्ञानिक अभ्यास सुरू केला असल्याचेही माहिती प्रा. रबीनारायण आचार्य यांनी दिली.

तज्ज्ञांच्या मते, ऑस्टिओपोरोसिस ही एक हाडे कमकुवत करणारी स्थिती आहे, त्यामुळे हाडे ठिसूळ बनतात आणि ती तुटण्याची शक्यता वाढते. हाडांची ताकद आणि घनता कमी झाल्यामुळे हा आजार हळूहळू विकसित होतो आणि त्याला अनेकदा मूक आजार म्हटले जाते, कारण फ्रॅक्चर होईपर्यंत सहसा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. बऱ्याच प्रकरणांमध्ये, पहिले लक्षण म्हणजे अनेकदा नितंब, मनगट किंवा पाठीच्या कण्यामध्ये झालेले हाडांचे फ्रॅक्चर - ज्यामुळे वेदना, शरीराच्या स्थितीत बदल होतो. आणि जखम बरी व्हायला विलंब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

आयुर्वेदानुसार, ऑस्टिओपोरोसिस प्रामुख्याने वात दोषाच्या विकृतीशी संबंधित आहे, त्यामुळे हाडांची ताकद आणि हाडांची घनता कमी होते. ही शास्त्रीय समज आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाशी लक्षणीय साम्य दर्शवते. त्यात हाडांमधील खनिजांची कमतरता आणि वयानुसार होणारे आणि हाडांच्या आरोग्यावर परिणाम करणारे हार्मोनल बदल ऑस्टिओपोरोसिसला कारणीभूत ठरतात असे म्हटले आहे.

ऑस्टियोपोरोसिसच्या व्यवस्थापनात आयुर्वेदाचा प्रतिबंधात्मक आणि समग्र दृष्टिकोन हाडे मजबूत करण्यासाठी, संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी आणि झीज रोखण्यासाठी आयुर्वेद एक व्यापक व्यवस्थापन दृष्टिकोन दिला जावू शकतो. सीसीआरएएसने रसायन चिकित्सा (कायाकल्प),स्नेहन (उपचारात्मक मालिश),औषधी सूत्रीकरण,वात-शामक आहार आणि जीवनशैली,योग आणि सौम्य व्यायाम अशा प्रमुख उपाययोजना प्रस्तावीत केल्या आहेत.

जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन 2025 निमित्त आयुष मंत्रालयाने नागरिकांना, विशेषतः वृद्ध व्यक्तींना आणि रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना आयुर्वेदिक प्रतिबंधात्मक उपाय, संतुलित आहार आणि सौम्य शारीरिक हालचालींचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. या पद्धतींचा जीवनात समावेश करून, व्यक्ती आपली हाडे मजबूत करू शकतात, , असेआयूष मंत्रालयाने म्हटले आहे.

  • जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन 2025 निमित्त आयुष मंत्रालयाने नागरिकांना, विशेषतः वृद्ध व्यक्तींना आणि रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना आयुर्वेदिक प्रतिबंधात्मक उपाय, संतुलित आहार आणि सौम्य शारीरिक हालचालींचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. या सर्वांगीण पद्धतींचा दैनंदिन जीवनात समावेश करून, व्यक्ती आपली हाडे मजबूत करू शकतात, अस्थिभंगाचा धोका कमी करू शकतात तसेच निरोगी, अधिक सक्रिय वृद्धत्वाचा मार्ग सुनिश्चित करू शकतात, असा विश्वास आयूष मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT