पुणे

पुणे : चिमुरड्यांनी सर केला तैलबैल सुळका

अमृता चौगुले

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त लोणावळाजवळील दुर्गम तैलबैल सुळका सर करून छत्रपती शिवरायांना चिमुरड्यांनी मानवंदना दिली.

हर हर महादेव, जय शिवरायच्या जयघोषात बाल गिर्यारोहक संस्कार खटावकर (वय 8), ध—ुवी पडवळ (वय 9) यांच्यासह पुण्यातील तीस जणांनी सुळक्यावर चढाई केली. दोन्ही साहसी चिमुरड्यांच्या या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकीत केले.

सिंहगडचे गिर्यारोहक लहू उघडे यांच्या पुढाकाराने मोहिमेचे आयोजन केले होते. कृष्णा मरगळे, तुषार दिघे, शैलेश थोरवे, अभिषेक मुजुमरे, अक्षय गुजर, मनोज वांगड आदींनी संयोजन केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT