पुणे

पौड येथील पीएमपीच्या बसथांब्याची दुर्दशा

अमृता चौगुले

पौड : पुढारी वृत्तसेवा :  पौड (ता. मुळशी) येथील पंचायत समिती प्रवेशद्वारासमोर असलेल्या पीएमपीएमएलच्या (पीएमपी) बसथांब्याची पडझड झाली आहे. प्रवाशांना थांबण्यासाठी याचा आधार घेणेही अवघड झाले आहे. पौड गावामध्ये मुख्य रस्त्यावर वनविभागाच्या कार्यालयाबाहेर पीएमपीएमएलचा बसथांबा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी येथे एक चारचाकी धडकली होती. यामुळे या बसथांब्याचा एक खांब तुटला. जवळील दुकानदाराने या थांब्याची थोडीशी डागडुजी केली. मात्र, वारे आणि पाऊस यामुळे हा थांबा मागील बाजूला वाकला, तसेच यात असलेल्या खुर्च्याही तुटल्या. हा बसथांबा पंचायत समितीच्या इमारती समोरच आहे.

पुण्याकडे जाण्यासाठी पौड गावातील सर्व शासकीय कार्यालयातील प्रवास, तसेच पौड ग्रामस्थ याच थांब्याचा वापर करतात. मात्र, थांबा धोकादायक, तसेच तसेच खुर्च्या तुटक्या असल्याने येथे प्रवाशांना बसची वाट उभी राहूनच पाहावी लागत आहे. येथील बस थांब्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन चांगला थांबा तयार करावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

पौड पंचायत समितीसमोरील बसथांब्याची दुरवस्था झाली असून, प्रवाशांना हा थांबा वापरता येत नाही. या थांब्याचे नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून करण्यात येईल.
                                – महादेव कोंढरे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस मुळशी

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT