पिंपरी : फोनवर अश्लील बोलून शिक्षकाने तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला. हा धक्कादायक प्रकार 23 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान भोसरी येथे घडला. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या आईने गुरुवारी (दि. 10) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संतोष रंगनाथ गाडगे (वय व पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भोसरी येथील एका शाळेत शिक्षक आहे. दरम्यान, त्याने फिर्यादी यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींना रात्री अपरात्री फोन केले. फोनवरून अश्लील प्रश्न विचारून आरोपीने मुलींचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास महिला पोलिस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.