पुणे: सोमवारी (दि. 14) राज्यातील बहुतांश भागांतील पावसाचे अलर्ट विरले झाले. त्यामुळे विदर्भ वगळता उर्वरित राज्यातून पावसाची शक्यता कमी झाली आहे. रविवारी (दि. 13) राज्यातील पंधरा जिल्ह्यांना 14 ते 17 एप्रिलपर्यंत पावसाचे ’यलो अलर्ट’ हवामान विभागाने जाहीर केले होते. मात्र, सोमवारी ते अलर्ट क्षीण झाले. फक्त विदर्भात 17 एप्रिलपर्यंत पावसाचे इशारे आहेत. मध्य, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण भागात 15 एप्रिलपर्यंतच पावसाची शक्यता वर्तविली आहे.
सोमवारचे तापमान : अकोला 42.4, मुंबई (कुलाबा) 33.6, सांताक्रुझ 33.2, रत्नागिरी 33.6, डहाणू 35.5, पुणे 40.8, जळगाव 39, कोल्हापूर 38.4, महाबळेश्वर 31.9, मालेगाव 41.8, नाशिक 38.1, सांगली 38.8, सातारा 38.2, सोलापूर 41, धाराशिव 39.6, छत्रपती संभाजीनगर 39.9, परभणी 40.6, अकोला 42.4, अमरावती 41.2, बुलडाणा 38.2, चंद्रपूर 42.2, गोंदिया 38.5, नागपूर 41, वाशिम 41.4, वर्धा 40, यवतमाळ 41.5.