The sting of dengue is increasing File Photo
पुणे

Dengue Disease | कीटकजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरात गेल्या काही दिवसांमध्ये चिकुनगुनिया, डेंग्यूसारख्या कीटकजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे. विषाणूच्या ट्रेंडमधील बदल आणि डासांच्या प्रजननासाठी अनुकूल वातावरण यामुळे आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

यंदा शहरात. झिका विषाणूचे १००, डेंग्यूचे २५१ आणि चिकुनगुनियाचे २२५ रुग्ण आढळले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, नॅशनल सेंटर फॉर व्हेक्टर बोर्न डिसीजेस कंट्रोल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर यंदा महापालिकेच्या आरोग्य विभागाने संशयित रुग्णांची तपासणी आणि आजारांच्या प्रादुर्भावावर

नियंत्रण याकडे बारकाईने लक्ष दिले आहे. तरीही, वातावरणातील अनपेक्षित बदलांमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ होताना दिसत आहे. महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे म्हणाले, चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये विषाणूचा ट्रेंडमधील बदलांमुळे वाढ होताना दिसत आहे.

विषाणू साधारणपणे दहा वर्षांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणतो. त्यामुळे ठरावीक काळाने कीटकजन्य रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते. एकदा संसर्गाविरुद्ध सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित झाली की हळूहळू रुग्णसंख्या कमी

डेंग्यू, चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाल्यामुळे खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये बेडची तीव्र कमतरता भासत आहे. पूर्वी फक्त आयसीयू बेडची कमतरता भासत होती. यावर्षी परिस्थिती अधिक बिकट असल्याचे खासगी रुग्णालयांचे म्हणणे आहे. सामान्य बेड आणि आपत्कालीन बेड रुग्णांसाठी अपुरे पडत आहेत. परिस्थिती खरोखरच बिकट आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ आयसीयू आणि जनरल वॉर्ड अशा दोन्ही खाटांची तीव्र टंचाई आहे. तीव्र संसर्ग झालेल्या रुग्णांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता भासते. त्यांना बरे होण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे हॉस्पिटलायझेशनचा कालावधी जास्त असतो आणि त्यामुळे बेडची कमतरता असते. रुग्णालयात दाखल झालेले बहुतेक रुग्ण डेंग्यू, चिकुनगुनिया आणि विषाणूजन्य तापाने आजारी आहेत आणि त्यात सर्व वयोगटांचा समावेश आहे.
डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, पुणे शाखा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT