परतीचा पाऊस File Photo
पुणे

घोरवडी धरण परिसरात जोरदार पाऊस

पुढारी वृत्तसेवा

किल्ले पुरंदर परिसरात दोन दिवस जोरदार पाऊस झाला. परिसरातील घोरवडी धरणाची एकूण साठवण क्षमता 67.50 दशलक्ष घनफूट इतकी आहे. सद्य:स्थितीत धारणामध्ये 60 दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, हे धरण 90 टक्के भरले असल्याची माहिती गराडे पाटबंधारे शाखा अभियंता अविनाश जगताप यांनी दिली.

घोरवडी धरणातून सासवड शहराची पाणीपुरवठा योजना, दिवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, तसेच सुपे व भिवडी, पिंपळे या गावांना पाणीपुरवठा केला जातो. या धरणावर परिसरातील 55 हेक्टर क्षेत्राचे सिंचन होते. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने सप्टेंबरअखेरपर्यंत धरणामध्ये केवळ 11 द.ल.घ.फू. इतका पाणीसाठा उपलब्ध होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरण 90 टक्के भरले असल्याचे सासवड पाटबंधारे शाखेचे संदेशक एस. एच. कोरपडे यांनी सांगितले. तसेच, सासवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याचे सासवड नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता संकेत नंदवंशी यांनी सांगितले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT