बंदी झुगारून काही मंडळांनी मिरवणुकीत डीजे आणला आणि लेसर किरण नाचवले. Pudhari File Photo
पुणे

मंडळांनो, पुढील वर्षी तरी डीजे वाजवू नका...

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

प्रत्येक वर्षी पुण्याच्या गणेश- ोत्सव विसर्जन मिरवणुकीचे स्वरूप भीषण होत चालले आहे. अगदी मोजकी मंडळेच संस्कृती, परंपरा, शिस्त पाळताना दिसतात. इतर सगळ्यांसाठी विसर्जन मिरवणूक म्हणजे कर्णकर्कश आवाजातल्या चित्रपटातील गाण्यांवर रात्रभर नाचण्याची संधी एवढाच अर्थ उरला आहे. हे चित्र वेळीच बदलायला हवे. सर्व मंडळांना मिरवणुकीतील प्रत्येक रुपयाचा जमाखर्च सादर करणे, ऑडिट, इन्कम टॅक्स ही बंधने लावायला हवीत. तेव्हाच कुठे डीजे वाजवणारी मंडळे शहाणी होतील, ही प्रतिक्रिया आहे डीजेच्या दणदणाटाला वैतागलेल्या मनोज पटवर्धन यांची.

मृत्यूला जबाबदार कोण?

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत यंदा डीजेच्या आवाजाने नागरिकांचे हाल झाले, डीजेच्या वाढलेल्या आवाजावर यंत्रणेने काहीच केले नाही, यावर सर्व क्षेत्रांतील व्यक्तींनी प्रतिक्रियांमधून आवाज उठवला आहे. विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यात पोलिस आणि प्रशासन कमी पडल्याची प्रतिक्रिया काहींनी दिली आहे. तर काहींनी तीन जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला आहे. डॉक्टर असो वा वकील... आयटीतील नोकरदार असो वा शिक्षक... सर्व स्तरांतून याविरोधात प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी पुढील वर्षी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकांमध्ये मंडळांनी डीजे वाजवू नये, असे आवाहन केले आहे. तर अनेकांनी डीजे वाजविणाऱ्या मंडळांवर कारवाईची मागणी केली आहे.

राजकुमार शाह: दैनिक 'पुढारी'ने विशेष पान प्रसिद्ध करून विसर्जन मिरवणुकीतील वास्तव चित्र मांडले आहे, गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेमुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास मांडला आहे, नागरिकांची व्यथा मांडली आहे. डीजेच्या वाढत्या आवाजाबद्दल माहीत असूनसुद्धा याची दखल कोणी घेत नाहीये, हे चुकीचे आहे.

बाळासाहेब जानराव : दै. पुढारी ने प्रसिद्ध केलेल्या विशेष पानांतून समोर आणलेले वास्तव खरे आहे. यापासून सर्व पुणेकरांनी बोध घेणे आवश्यक आहे. स्मिता सरदेसाई लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला गणेशोत्सव वेगळा होता. त्या वेळी असे चित्र नव्हते. आज सार्वजनिक गणेशोत्सवाने अतिशय भयानक रूप धारण केले आहे. त्यामध्ये भावना नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही. हे वास्तव बदलायला हवे. गणेशोत्सवाचा खरा उद्देश आपण जाणला पाहिजे, कल्पेश यादव (संस्थापक, इनोव्हेशन फाउंडेशन) ही पुणे आणि पिपरी-चिंचवड शहरांत सर्रास नियमांचे उल्लंघन करून, रात्रीच्या वेळी कार्यक्रमांमध्ये लेझर लाइटचा वापर तसेच त्याचप्रमाणे आवाजाचा दणदणाट करण्यात आला. या संपूर्ण प्रकाराला पुणे पोलिस, पुणे महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा सरकारी यंत्रणा दोषी आहेत. या सरकारी यंत्रणांनी वेळीच यावर लक्ष घालावे, लेझर किंवा मोठ्या डीजे सिस्टीम लावणाऱ्या व्यक्तींवर वचक बसवण्यासाठी नियमावली आखून द्यावी. किमान इथून पुढे असे जीव जाणार नाहीत, याची काळजी घेतली जावी.

बोरकर : विसर्जन मिरवणु‌कीतील डीजेच्या वाढलेल्या आवाजाचे चित्र खरे आहे. राजकीय नेत्यांपासून सर्वजण या विषयावर बोलणे टाळतात. दै. 'पुढारी'ने बातम्यांमधून हे चित्र समोर आणले, ही महत्त्वाची गोष्ट आहे. किरण सोनार पुढारीच्या विशेष पानांतून वास्तव समोर आले आहे. डीजे वाजवणाऱ्या गणेश मंडळांना कोण आवरणार?

अॅड. शिरीष शिंदे मीसुद्धा एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष आहे, आमचे मंडळ पास असूनही मिरवणुकीत सहभागी होत नाही. यंदा गणेशोत्सवाच्या अगोदर दै. 'पुढारी'ने, पुणे महापालिकेने, पुणे पोलिसांनी मंडळांच्या बैठका घेतल्या होत्या. बैठकांमध्ये उत्सवात नियमांचे पालन करू, अशी ग्वाहीही मंडळातर्फे दिली गेली होती. डीजेची आवाजाची पातळी ओलांडली तर आणि लेसरचा उपयोग केला, तर मंडळांवर कारवाई करू, असे पोलिसांनी सांगितले होते. असे असतानाही काही मंडळांचा अपवाद वगळता बरीचशी मंडळे बेशिस्तपणे मिरवणुकीत दाखल झाली, अनेक मंडळांची डीजेच्या आवाजाची पातळी धोकादायक पातळीपर्यंत होती, लेझरचा वापर झाला. हॉस्पिटलमधील रुग्ण, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक या कशाचीही पर्वा न करता डीजे, चित्रपटातील गाणी आणि त्यावर थिरकणारे तरुण-तरुणी हे गणेशोत्सव हा धार्मिक, सामाजिक आणि पावित्र्याचा उत्सव आहे, हेच विसरून गेले होते. डीजेच्या विरोधात ढिम्म यंत्रणेने तर काहीच केले नाही

पुढारीवर प्रतिक्रियांचा पाऊस गणेशोत्सव विसर्जन

मिरवणुकीच्या दरम्यान डीजेच्या वाढलेल्या आवाजामुळे तीन जणांना जीव गमवावा लागला. दैनिक 'पुढारी'ने 'समाजपुरुषा, जागा हो' हे विशेष पान प्रसिद्ध करून डीजेच्या वाढलेल्या आवाजाचे वास्तव चित्र मांडले. त्यावर पुणेकरांनी 'पुढारी'वर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. या प्रतिक्रियांमधून डीजेच्या विरोधात पुणेकरांनी आपली चीड, झालेला मनस्ताप बोलका केला आहे. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया आम्ही देत आहोत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT