CS Exam File Photo
पुणे

CS Exam | सीएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने सीएस डिसेंबर २०२४ एक्झिक्युटिव्ह आणि व्होकेशनल परीक्षेसाठी विलंब शुल्काशिवाय अर्जाची तारीख १० ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे.

सीएस डिसेंबर २०२४ ची नोंदणी २५ सप्टेंबर रोजी बंद होणार होती. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना https:/// icsi. edu/ home या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सीएस डिसेंबर २०२४ साठी अर्ज भरता येणार आहे.

आयसीएसआयच्या सूचनेनुसार, तांत्रिक समस्यांमुळे सीएस एक्झिक्युटिव्ह, प्रोफेशनल डिसेंबर २०२४ नोंदणीची तारीख वाढविण्यात आली आहे. आयसीएसआयने सीएस डिसेंबर २०२४ नोंदणी फॉर्म विलंब शुल्कासह सबमिट करण्याची अंतिम तारीख ११ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत वाढवली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT