पुणे

पुणे : अमलीपदार्थ विक्री करणार्‍याला अटक

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चरस हा अमलीपदार्थ विक्रीसाठी पुण्यात आलेल्या औरगंजेब ऊर्फ रंगा परदेशी (27, रा. नगर) याला अमली पदार्थ विरोधी पथकाने उरुळी कांचन येथून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 24 लाख रुपये किमतीचे तब्बल दोन किलो चरस जप्त केले. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलिस निरीक्षक सुनील थोपटे हे कर्मचार्‍यांसह हद्दीत गस्तीवर होते.

या दरम्यान लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उरुळी कांचन येथे एक संशयित हा चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पथकाने सापळा रचून परदेशी याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन किलो चरस आढळून आला.

गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक शुभांगी नरके, अंमलदार योगेश मांढरे, युवराज कांबळे, संतोष देशपांडे, संतोष जाधव, चेतन गायकवाड यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT