शिरवली येथे दरोडा; ५ जण गंभीर जखमी File Photo
पुणे

शिरवली येथे दरोडा; ५ जण गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

सांगवी : पुढारी वृत्तसेवा

बारामती तालुक्यातील शिरवली येथे (रविवार) ( दि.२२ ) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत ९ लाख ८० हजार रुपये रोख रक्कम व चार तोळे सोन्याचे दागिने सशस्त्राचा धाक दाखवून लंपास केले.

तसेच घरासमोर लावलेल्या इरटीका गाडीच्या काचा फोडून नुकसान केले आहे. या घटनेत पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. माळेगाव पोलिस ठाण्यात या घटनेची रात्रीच खबर दिली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT