डहाणू | अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई File Photo
पालघर

डहाणू | अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

डहाणू: डहाणू तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या गौण खनिजाची अवैध रित्या वाहतूक होत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. डहाणूचे तहसीलदार सुनील कोळी यांनी कारवाई करत तीन वाहने जप्त केली असून, संबंधित वाहनांना शासनाची परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाचे काम करणाऱ्या आर. के. सी. कंत्राटदार कंपनीच्या ताफ्यातील तीन वाहनांमध्ये विना परवाना गौण खनिजाची वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार सुनील कोळी यांना मिळाली. त्यांनी बुधवारी रात्री या वाहतुकीची चौकशी केली असता, राजस्थान राज्यातील नोंदणी असलेल्या तीन वाहनांमधून महसूल बुडवून गौण खनिजाची वाहतूक होत असल्याचे आढळले. यावर तातडीने कारवाई करत तहसीलदारांनी तीनही वाहने ताब्यात घेतली.

तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधितांना आधीच नोटीस बजावून कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कागदपत्रे सादर न झाल्याने आता तीनही वाहनांवर सुमारे ८ लाख रुपयांचा दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे आढळले आहे. त्यांना तत्काळ कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप कागदपत्रे सादर न केल्यामुळे योग्य ती कारवाई सुरू आहे.
सुनील कोळी, तहसीलदार डहाणू
66 आमच्याकडे शासनाच्या आवश्यक सर्व परवानग्या आहेत. वाहनांची कागदपत्रे सादर करण्याची सूचना मला व्यक्तिशः प्राप्त झालेली नाही. तशी सूचना मिळाल्यास आम्ही कागदपत्रे सादर करू.
दशरथ वाघेला, आर. के. सी. कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT