जव्हार : जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सागपाणी व रिठीपाडा गावात हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड सुरू आहे. त्यातच दिवसाआड पाणी येत असल्याने महिलांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वाद घालीत हंडाभर पाणी मिळते. ही परिस्थिती आता एप्रिल Goods महिन्यापासूनच सागपाणी व रिठीपाडा गावात सुरू झाली आहे.
पुढील मे महिना कसा? काढायचा ह्या चिंतेत येथील ग्रामस्थ आहेत. रात्री बेरात्री वणवण भटकत भटकण्याची वेळ महिलांवर आली आहे. सागपाणी व रिठीपाडा गावात यावर्षीही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील कुटुंबांना पिण्याचे पाणी मिळावे याकरिता येथील सरपंच, ग्रामसेवक यांनी पाणी पुरवठा विभाग व गटविकास अधिकारी पंचायत समितीकडे टँकरची मागणी करूनही पाणी पुरवठा सुरू नाही. त्या गावांना जल जीवन योजनेचे काम करणारे ठेकेदार यांच्या मार्फत दिवसाआड पिकअपमध्ये पाण्याची टाकी ठेवून पाणी पुरवठा सुरू आहे. तोही काही महिलांना हंडाभर पाणी मिळत नाही. यामुळे यावर्षी ह्या गावांना भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
सागपाणी व रिठीपाडा गावाची पाणी टंचाईदूर करण्याकरिता ह्या गावांना जलजीवन मिशनचे हरघर योजनेचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. जल जीवन योजनेचे पाणी मिळेल की नाही? ह्या चिंतेत येथील महिलावर्ग आहे. येथील ग्रामस्थ, महिलांना पाण्यासाठी रोजच काळजी करीत शेतीचे कामे, रोजगार, टाकून पाण्यासाठी भटकण्याची वेळ येथील महिलांवर आली आहे. जल जीवन योजनेचे ठेकेदार थोडेफार पाणी टाकतो त्या पाण्यासाठी झुंबड सुरू आहे. तसेच हंडाभर पाण्यासाठी महिलांमध्ये वाद, भांडणे देखील झाल्याचे येथील ग्रामस्थ सांगत आहेत. पाणी पुरवठा विभागाकडून पाण्याची मागणी केली जात आहे.
भीषण पाणी टंचाई संदर्भात गावातील वावर वांगणी ग्रामपंचायतचे सरपंच विनोद बुधर त्यांची टीम यांनी गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून त्या गावातील भीषण पाणीटंचाई संदर्भात चर्चा केली आहे. तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ता सुनिल जाबर यांनी फोनद्वारे पाणी पुरवठा उपअभियंता राजेश पाध्ये यांचेशी संवाद साधून टँकर चालू करणेसाठी चर्चा केली. काही दिवसातच जल जीवन योजना सुरू होईल असेही पाणी पुरवठा अधिकारी सांगत आहेत. जल जीवन योजनेचे पाणी कधी सुरू होईल असे ह्या प्रतिक्षेत महिला वर्ग आहे.