विक्रमगड : विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे आगमन जसजसे जवळ येत आहे तसतशी बाजारपेठेला झळाळी येत आहे. बाजारात यंदा शाडूमातीच्या गणेशमूर्ती सोबतच चांदीच्या मूर्तीना मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. सोबतच चांदीचे मूषक, मोदक, मुकुट, दागिने, जास्वंदासह विविध प्रकारचे हार, फुले, दुर्वा, नारळ, पूजेसाठी ताम्हण, वाटी, पळी, समई, कुंकवाचे करंडे या वस्तूंना ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये तीन हजार रुपयांत सुबक गणेशमूर्ती तर ५०० रुपांपासून चांदीच्या दुर्वा, हार, फुले उपलब्ध आहेत.
दरम्यान, गेल्या काही वर्षापासून शहरात पर्यावरणपूरक गणेश- उत्सवाचा ट्रेंड रुजला आहे. यासोबत अनेक भाविक स्वतःच्या घरी आणि काही मंडळे चांदीची मूर्ती खरेदी करून तिची स्थापना करतात. विशेष म्हणजे अशा मूर्तीमध्ये दरवर्षी भर घातली जात आहे. यंदाही त्यासाठी लगबग सुरू आहे. अनेक भाविकांनी ऐनवेळी धावपळ नको म्हणून ज्वेलर्सच्या दुकानात आधीच बुकिंग केली आहे.
४० ग्रॅमच्या भरीव चांदीच्या पत्र्यावरील गणपती मूर्ती आणि ४० ग्रॅमची भरीव मूर्ती बाजारात उपलब्ध आहे. मूर्तीला पसंती सोबत गणपतीसाठी विविध आभूषणे खरेदीकडे भाविकांचा कल दिसतो.
बजेटनुसार ग्राहकांकडे विविध पर्याय उपलब्ध शहरातील ज्वेलर्समध्ये वजन व बजेटनुसार चांदीच्या वस्तूंचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यात गणपती बाप्पांची मूर्ती, गणपती बाप्पांसाठी चांदीचा हार दोन हजारांपासून पुढे, दुर्वा २५१ रुपये, जास्वंद फूल ५५१, मोदक ८०९ पासून, मूषक ८०० पासून पुढे, तर सुपारी, विडधाची पाने, केवड्याचे पानांची किंमत ५०० रुपयांपासून पुढे असून ग्राहकांसाठी पसंत पडेल अशा वस्तू उपलब्ध आहेत.