आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात सहा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी महायुती महाविकास आघाडी या प्रमुख पक्षांसह बहुजन विकास आघाडी समोरासमोर उभे ठाकणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. (Legislative Council Elections)
सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना महाविकास आघाडीचे, बहुजन विकास आघाडीचे कडवे आव्हान असणार आहे. तर काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतांसाठी कसरत करावी लागणार आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही प्रमुख लढत असलेल्या पक्षांमध्ये तिकिटासाठी भाऊगर्दी होणार असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची व बहुजन विकास आघाडीची मतांची झालेली पीछेहाट लक्षात घेता, भाजप बहुतांश विधानसभांवर दावा बोलणार असल्याची बर्चा सध्या आहे. जास्त जागा भाजपला मिळाल्यास मित्रपक्ष शिवसेनेतून (शिंदे गट) बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा फायदा महाविकास आघाडीला व बहुजन विकास आघाडीला होणार असल्याचे राजकीय गोटातून सांगितले जात आहे.
पालघर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. श्रीनिवास वनगा हे सध्या येथे शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आहेत. या विधानसभेवर शिवसेना आपला प्रबळ दावा करीत आहे. श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्यावरून चर्चा सुरू आहे. अलीकडेच शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले खासदार राजेंद्र गावित यांनाही पुनर्वसनाच्या शब्दातून पालघरची जागा मिळणे अपेक्षित आहे. त्यातच महाविकास आघाडीकडे पालघर विधानसभेसाठी चेहरा नसल्याने त्यांच्यासमोर पेच आहे. मात्र, उमेदवारीसाठी जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा इच्छुक आहेत. ही विधानसभा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास लढत चुरशीची होईल. त्यातच भाजप-सेना यांच्यामध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच झाल्यास त्यांच्यातील बंडखोरी महाविकास आघाडीला मदत करेल, अशी शक्यता आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा गेल्यास काशिनाथ चौधरी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या विधानसभेत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी, अशी खरी लढत होणार आहे.
डहाणू विधानसभा क्षेत्राच्या ग्रामीण भागामध्ये माकपचे एकहाती प्राबल्य असल्यामुळे या ठिकाणी विनोद निकोले यांच्या रूपाने माकपचा एकमेव आमदार निवडून आला आहे. डहाणू विधानसभेसाठी मविआतर्फे त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे सांगितले जाते. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघांमध्ये एकट्या डहाणू मतदार संघात महाविकास आघाडीने मतांची आघाडी घेतली होती. हे लक्षात घेता महायुतीला येथे कडवे आव्हान असणार आहे. भाजपतर्फे माजी आमदार अमित घोडा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेना (शिंदे गट) या जागेवर आपला उमेदवार देण्यासाठी इच्छुक आहे. या विधानसभेत इतर उमेदवार उभे राहिले, तरी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, अशी कडवी लढत होण्याची चिन्हे आहेत.
बोईसर विधानसभेवर गेल्या दोन टर्म बहुजन विकास आघाडीचा उमेदवार निवडून येत आहे. आमदार राजेश पाटील यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे व कामांमुळे ते सुपरिचित झाले आहेत. त्यामुळे त्यांना येथे बहुजन विकास आघाडीमार्फत उमेदवारी मिळेल, असे दिसते. मात्र शिवसेना, भाजप व महाविकास आघाडीनेही याडहाणू मतदार संघात महाविकास आघाडीने मतांची आघाडी घेतली होती. हे लक्षात घेता महायुतीला येथे कडवे आव्हान असणार आहे. भाजपतर्फे माजी आमदार अमित घोडा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेना (शिंदे गट) या जागेवर आपला उमेदवार देण्यासाठी इच्छुक आहे. या विधानसभेत इतर उमेदवार उभे राहिले, तरी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, अशी कडवी लढत होण्याची चिन्हे आहेत.
बोईसर विधानसभेवर गेल्या दोन टर्म बहुजन विकास आघाडीचा उमेदवार निवडून येत आहे. आमदार राजेश पाटील यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे व कामांमुळे ते सुपरिचित झाले आहेत. त्यामुळे त्यांना येथे बहुजन विकास आघाडीमार्फत उमेदवारी मिळेल, असे दिसते. मात्र शिवसेना, भाजप व महाविकास आघाडीनेही या विधानसभेकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणूक आव्हानात्मक जाणार आहे. लोकसेवा व इतर कामांमुळे परिचित असलेले डॉक्टर विश्वास वळवी हे महाविकास आघाडीकडून उमेदवारीचे दावेदार मानले जात आहेत. तर भाजपमार्फत विलास तरे यांना येथे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तिसरीकडे शिवसेनेकडून (शिंदे गट) जगदीश धोडी, शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य वैदही वाढण याही येथे उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. बोईसर मतदार संघात महाविकास आघाडी, महायुती व बहुजन विकास आघाडीमध्ये येथे प्रामुख्याने लढत पाहायला मिळणार आहे.
विक्रमगड विधानसभा मतदार संघामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी व महायुती यांच्यात लढत होणार असली, तरी भिवंडीमध्ये घेतलेल्या मतांच्या जोरावर कपिल पाटील यांना मात देणारे जिजाऊ विकास पार्टीचे नीलेश सांबरे यांची भूमिका येथे विधानसभेत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महाविकास आघाडीच्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा हे सध्या या मतदार संघात आमदार आहेत. त्यांनी आमदारकीच्या काळात केलेली कामे, जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमार्फत त्यांना येथे तिकीट जाहीर होईल, असे म्हटले जात आहे. भाजपमार्फत सुरेखा थेतले, भोये आदींची नावे पुढे येत आहेत.
शिवसेनेकडून (शिंदे गट) जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम हे या मतदार संघात लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, महायुतीच्या निर्णयानंतर एका मित्र पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळाल्यास सेना-भाजपमध्ये फुटीचा डाव पडण्याची शक्यता आहे. त्यातच सुनील भुसारा यांच्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येही येथे फूट असल्याने त्याचा तोटा महाविकास आघाडीला होणार आहे, तर तिसरीकडे दांडग्या लोकसेवेमुळे प्रसिद्ध असलेले नीलेश सांबरे यांनी येथे उमेदवार उभा केल्यास महाविकास आघाडी व महायुतीला ही निवडणूक जड जाईल, असे एकंदरीत चित्र आहे.
नालासोपारा, वसई हे विधानसभा मतदार संघ गेल्या अनेक वर्षांपासून बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात आहेत. वसईत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर आमदार असून, त्यांचे सुपुत्र क्षितिज हे नालासोपारा मतदार संघाचे आमदार आहेत. आमदार हितेंद्र ठाकूर हे यापुढे निवडणूक लढणार नाहीत अशी चर्चा असली, तरी सध्याच्या राजकीय घडामोडी लक्षात घेता हितेंद्र ठाकूर किंवा त्यांच्या पत्नी प्रवीणा ठाकूर वसई मतदार संघामधून बहुजन विकास आघाडीतर्फे लढण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीचे विजय पाटील, भाजपतर्फे मनोज पाटील यांना येथे उमेदवारी मिळेल. त्यामुळे वसईत तिरंगी लढत पाहायला मिळेल.
नालासोपारा मतदार संघामध्ये सर्वाधिक मतदार आहेत. लोकसभेमध्ये या मतदार संघात महाविकास आघाडी, बहुजन विकास आघाडी पिछाडीवर पडली होती. येथे भाजपने मताधिक्य घेतले असल्यामुळे या मतदार संघात भाजप आपला उमेदवार उभा करणार, हे जवळपास निश्चित आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत तसेच महायुती समन्वयक राजन नाईक या इच्छुक उमेदवारांच्या नावाची येथे चर्चा आहे. याचसोबत महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे येथील स्थानिक नेतृत्व पंकज देशमुख यांना उमेदवारी मिळेल, असे एकंदरीत दिसून येत आहे. तर शिंदे गटाकडून नवीन दुबे उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.