नालासोपारा : वसई विरार महापालिकेचे औषध पुरवठा करणारे ठेकेदार बालकांच्या जीवावर उठल्याचं अन्न व औषध आणि प्रशासनाच्या कारवाईत समोर आले आहे. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपींवर कठोर कारवाई न केल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे पालघर जिल्हा संघटक जनार्दन पाटील यांनी पत्रकार परिषदेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
वसई विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयांना औषध पुरवठा करणार्या सात ठेकेदारांविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्वांचा मास्टर माईंड विजय शैलेंद्र चौधरी मे. कॅबीज जनरिक हाऊस हा सध्या नागपूरच्या जेलची हवा खात आहे. त्याने वरूण नितीन मोदी .. नितीन ताराचंद मोदी ... मे अमर एजन्सी. श्रवण पुखराजजी दाबी मे. श्याम फार्मा , मयंक हरखानी ...मे गणेश फार्मा अँड सर्जिकल एल एल पी. मिहीर त्रिवेदी .. मे ऍक्टिवेंटीजप्रा. ली.बायोटेक , यांच्यामार्फत अनिस अशरफ शेख , मे. प्रणिक एंटरप्राइजेस, यांच्याकडून वसई विरार महापालिकेला औषध पुरवठा केला होता. याप्रकरणी सात जणाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
खरंतर वसई विरार महानगरपालिकेने बनावट औषधांचा पुरवठा करणार्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करायला हवे होते मात्र या अधिकार्यानी याकडे डोळेझाक केल्याचा आरोप उद्धव ठाकरे शिवसेनेने केला आहे. बालकांच्या जीवाशी खेळणार्या या नराधमांना खरंतर फाशीची शिक्षा दिली पाहिजे. याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील यांनी अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून कठोर कारवाई करा अशी मागणी केली आहे.
बनावट औषधे बनवून पुरवठा करणारा विजय चौधरी हा प्रकारच्या दोन गुन्ह्यामध्ये नागपूर जेलची हवा खात आहे ..जर प्रामाणिक केलेली प्रमाणपत्र होती तर ती औषध बनावट कशी निघाली याची चौकशी होण आता गरजेचं आहे. अशी प्रमाणपत्र बनावट प्रमाणपत्र तर नव्हती ना यामध्ये वसई विरार महापालिकेचे आरोग्य अधिकारी सामील तर नाही ना? अशी शंका यानिमित्ताने उपस्थित केली जात आहे.
पालघर जिल्हा झाला असला तरी अशा बनावट औषधांची तपासणी करण्यासाठी आपल्याकडे प्रयोगशाळा मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे अशा नराधमांचं फावत आहे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने सोयी सुविधांनी सुसज्ज होण गरजेचे आहे. बालकांच्या जिवाशी खेळ करणार्या बनावट औषधांच्या या गंभीर मुद्दयाकडे महाराष्ट्र शासन याकडे कसं पाहतं याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे .
वसई विरार महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी भक्ती चौधरी यांनी पालिकेने औषधे खरेदी करताना त्यांची लागणारी प्रमाणपत्रे घेऊन औषधे घेतले असल्याचे सांगितला आहे. यासंदर्भात बोलण्यास त्यांनी नकार दिला असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे या विषयावर बोलता येणार नाही. असे स्पष्टीकरण दिले आहे.