नाशिक : नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७ मधील गंगापूररोड परिसरात शिवसत्य मैदानातील नविन जलकुंभावरून पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी शनिवार(दि.७) पासून सात दिवस चाचणी घेतली जाणार असल्याने गंगापूररोड परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
सहदेवनगर, डी. के नगर, गीतांजली सोसायटी, विसे चौक, सिध्दीविनायक कॉलनी, प्रमोदनगर, शांतिनकेतन कॉलनी, आयचित नगर, चैतन्य नगर, चव्हाण कॉलनी, पंपिग स्टेशन, माणिकनगर, तुळजा भवानी मंदिर परिसर, श्रमिक कॉलनी, विनायक कॉलनी, राममंदिर परिसर, सागरदर्शन कॉलनी, शांतिनिकेतन सोसायटी, शालिमार सोसायटी आदी भागांमध्ये सायंकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने तसेच काही ठिकाणी गढूळ पाणी पुरवठा होऊ शकतो, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.