कांचने येथे धरणात बुडून एकाचा मृत्यू  File Photo
नाशिक

Nashik News | कांचने येथे धरणात बुडून एकाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

देवळा ; तालुक्यातील पश्चिम भागातील कांचणे शिवारात नागोणे धरणात सोमवारी (दि. २३ )रोजी एका युवकाचा बुडून मृत्यू झाला असून, या घटनेबाबत देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कांचणे ता. देवळा येथील संदीप काबू पिंपळे (२७) हा विवाहित तरुण रविवारी (दि. २४) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या नागोणे धरणात मासे पकडण्यासाठी गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची खबर येथील पोलीस पाटील दिंगबर सोनवणे यांनी देवळा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सोमवारी दि. २३ रोजी सकाळी १० वाजता स्थानिकांच्या मदतीने पिंपळे याला धरणातून बाहेर काढण्यात यश आले. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून मयत संदीप पिंपळे याच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन मत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत पिंपळे याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेने कांचणे गावांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT