नांशिक : शहर आयुक्तालयातील पोलिस कर्मचारी अश्विनी देवरे यांची व त्यांच्या दोन्ही मुले शौर्य व अनिकेत गोकुळ देवरे यांची बायथल ट्रायथल जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतील मोसेल बे या शहरामध्ये डिसेंबर २०२५ मध्ये होणार आहे.
इएमपीएफआय –मॉडर्न पेंटाथलॉन फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्पर्धा ४ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत देवा स्विमिंग इन्स्टिट्यूट, वंदना नगर, इंदूर येथे पार पडल्या. या स्पर्धेत नाशिकच्या राजमाता जिजाऊ तरण तलाव येथील खेळाडूंनी सहभाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेतून पहिल्या तीन क्रमांकावर आलेल्या खेळाडूंची निवड १३ जागतिक स्पर्धेसाठी करण्यात आली आहे, त्यामध्ये देवरे माता व पुत्रांचा समावेश आहे.
याच बरोबर नाशिकमधील कार्तिकी काकड, वेदांत काकड, अस्मि हिरवे, आर्या हिरवे, शशफा शाहिद या खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. अश्विनी देवरे शहर आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांनी या अगोदरही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळविले आहे. यासाठी त्यांना राजमाता जिजाऊ तरण तलावाच्या प्रशिक्षक व मार्गदर्शक माया जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.