साखरपुडा मोडल्याचा राग मनात धरून विनयभंग File Photo
नाशिक

Nashik Crime | साखरपुडा मोडल्याचा राग मनात धरून विनयभंग

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जमलेला साखरपुडा मोडल्याचा राग मनात धरून संशयिताने पीडितेच्या घरी जात विनयभंग केला. त्याचा जाब विचारणाऱ्या पीडितेच्या नातलगांना संशयित व साथीदारांनी मारहाण केली. अफजल खान, सद्दाम, मेहताब, अल्ताब, अहमद (सर्व रा. अंबड) अशी संशयितांची नावे आहेत.

पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित अफजल याच्याशी जमलेला साखरपुडा तोडल्याने संशयिताने फोनवरून पीडितेला शिवीगाळ केली. तसेच, शनिवारी (दि. २१) पीडितेच्या घरी जाऊन माझ्याशी लग्न का करीत नाही, असे म्हणून विनयभंग केला. त्याचा जाब पीडितेचे काका, मामा यांनी संशयिताला विचारला असता, संशयितांनी लाकडी फावडे, लोखंडी हातोड्याने मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी अंबड पोलिसांत विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. तर, अफजल खान (रा. विराटनगर, अंबड लिंक रोड) याच्या फिर्यादीनुसार, साखरपुडा झालेल्या युवतीने फोनवरून त्यास शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारल्यानंतर युवतीचे वडील नौशाद खान, मामा निसार शेख, काका मोहम्मद ताजशेख, परवेज आलम शेख यांच्यासह सहा-सात जणांनी अफजल खान यांच्या घराजवळ जात शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारून दुखापत केली. अंबड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT