नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई, तीन बांगलादेशी ताब्यात FiIle Photo
नाशिक

Nashik Crime | नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई, तीन बांगलादेशी ताब्यात

गणेश सोनवणे

नाशिक : पाथर्डी गाव परिसरातून तीन बांगलादेशी नागरिक व त्यांना मदत करणाऱ्या स्थानिक नागरिकास दहशतवादविरोधी पथक व इंदिरानगर पोलिसांनी रविवारी (दि. १८) पकडले आहे. चौघांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

शहरात तीन बांगलादेशी नागरिक अवैधरीत्या राहत असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार इंदिरानगर पोलिसांनी पथकासोबत सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यात दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. सखोल तपासात एक महिला स्पा सेंटरमध्ये तर एक महिला ब्युटीपार्लरमध्ये काम करत असल्याचे आढळून आले. तर पुरुष घरातच राहत असल्याचे समोर आले. या तिघांनाही शहरात राहण्यासाठी घर उपलब्ध करून देण्यासाठी एका स्थानिक नागरिकाने मदत केल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. सखोल चौकशीत तिघे अवैधरीत्या शहरात राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिघांसह त्यांना मदत करणाऱ्या चौथ्या व्यक्तीविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT