वेध सिंहस्थाचे : Simhastha Kumbh Mela Nashik Pudhari News Network
नाशिक

Kumbh Mela Nashik : सिंहस्थाच्या सात हजार कोटींच्या कामांचा होणार शुभारंभ

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वला कार्यक्रम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : राज्यात नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता आठवडाभरात होण्याची शक्यता आहे. निवडणूक आचारसंहितेपूर्वी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा बार उडणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक व त्र्यंबकेश्‍वरमध्ये प्रस्तावित ७ हजार कोटींपेक्षा अधिकच्या कामांचे एकत्रितपणे भूमीपूजन केले जाणार आहे. याबाबतची तयारी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची तारीख अद्याप अंतिम झालेली नाही. परंतू, 7 नोव्हेंबर तारीख अंतिम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Nashik Latest News

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामांचे भूमीपूजन करण्याचे नियोजन प्रसिधाकारणाने सुरू आहे. नाशिक व त्र्यंबकेश्‍वर शहरातील विविध कामांचा यात समावेश असून केंद्र शासनाच्या निधीचा समावेश केल्यास जवळपास १० हजार कोटींपर्यंत हा आकडा पोहोचेल.
शेखर सिंह, आयुक्त (कुंभमेळा प्राधिकरण)

कुंभमेळा कामांच्या तयारीला वेग आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे नाशिकचा दौरा करणार आहेत. त्र्यंबकेश्‍वर शहरासाठीची उपसा जलसिंचन योजना, दर्शनपथ, शहरातंर्गत रस्ते यांच्यासह नाशिकमधील रस्ते, मलजल निस्सारण प्रकल्प, नाशिक ते त्र्यंबकेश्‍वर महामार्गाच्या सहापदरीकरणासह अन्य कामांचा समावेश आहे. साधुग्राम अधिग्रहण २७० एकर जागा (१०५० कोटी), नमामी गोदा प्रकल्प (२७०० कोटी),रामकालपथ पंचवटीतील मंदिरांचे सुशोभिकरण (१४६ कोटी), जिल्ह्यातील रस्ते- नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर (२२०० कोटी), ओझर विमानतळ विस्तारीकरण (६७० कोटी), राज्य महामार्ग (२२७० कोटी) या कामांची यात समावेश आहे. मुख्यमंत्री त्र्यंबकेश्‍वरला भेट देणार असल्याने त्यासाठी प्राधिकरण सर्वेतोपरी तयारी करत आहे. एकत्रितपणे कामांचे भूमीपूजन झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT