देवळाली कॅम्प (नाशिक) : चार दिवसापूर्वी कोयता गॅंगच्या गुन्हेगारांची पोलिसांनी देवळाली कॅम्पमध्ये धिंड काढलेली असतानाच शुक्रवारी (दि.3) पुन्हा खुनाचा गुन्ह्यातील संशयित सन्नी बाजीराव कदम यांच्यासह त्याची रील बनवत समाजमाध्यमांतून दहशत निर्माण करणाऱ्या कदम यांच्या साथीदारांची पोलिसांनी धिंड काढली.
पोलिस आयुक्तालय हद्दीत गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता ते मोडीत काढण्यासाठी पोलिस यंत्रणा ॲक्शन मोडवर आली असून आयुक्तालय हद्दीतील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या माध्यमातून त्या- त्या परिसरातील गुंडांची धरपकड करून दिंड काढली जात आहे. खुनातील संशयित कदम याची मिरवणूक काढून त्याची रील बनवणाऱ्या साथीदारांची धरपकड करून शहरातून ढिंड काढण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देवरे, शंकर डुकरे, मिताली कोळी, अनिल पवार, राहुल बलकवडे, सुभाष पानसरे, सुकदेव गिऱ्हे, नीलकंठ भुजबळ, सचिन बोरसे, सुनील जगदाळे, शाम सिद्धुरे, विजय कोकणे आदींसह कर्मचारी, होमगार्ड उपस्थित होते.