नेपाळमध्ये बस थेट नदीत कोसळली 
जळगाव

नेपाळमध्ये बसचा भीषण अपघात, जळगावच्या 14 जणांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

जळगांव : महाराष्ट्रातील प्रवाशांना नेपाळमध्ये घेऊन जाणारी उत्तर प्रदेशातील बस नदीत कोसळली असून यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भाविक देवदर्शनासाठी गेलेले असताना शुक्रवार दि. 23 दुपारी नेपाळच्या मर्स्यांगडी नदीत ही बस पडली. या बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते. अपघातात १४ भाविक मरण पावले असून त्यात एका बालकाचा समावेश आहे. १६ जण जखमी झाले असून त्यापैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, काही भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताला जिल्हाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. मृतांपैकी किती भाविक जळगावचे आहेत याची माहिती घेतली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील पोखरा येथून बस क्रमांक यूपी.५३.एफटी.७६२३ ही काठमांडूला जात होती. बसमधील बहुतांश भाविक हे महाराष्ट्रातील होते. नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 23) ११.३० वाजता हा अपघात झाला. एसपी बिरेंद्र शाही यांनी सांगितले की, बस मर्स्यांगडी अंबुखैरेनी नदीत पडली आहे. बचावकार्यात लष्कर आणि सशस्त्र दलांची मदत घेतली जात आहे.

गोरखपूरचे जिल्हाधिकारी कृष्णा करुणेश यांनी सांगितले की, बस गोरखपूरच्या केसरवाणी टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सीची असून महाराष्ट्रातील भाविकांनी बस बुक केली होती. दोन बसमधून ११० प्रवाशी नेपाळला प्रयागराज, अयोध्यामार्गे जात होते. यातील एका बसला अपघात झाला आहे. दुसऱ्या बसमध्ये प्रवास करणारे लोक नेपाळमधील मुगलिंग येथे थांबले असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, अपघातग्रस्त बसमधील काही भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मंत्री अनिल पाटील यांची माहिती

दरम्यान, पुनर्वसन विभागाचे अधिकारी हे जळगाव जिल्हाधिकारी, उत्तर प्रदेश मदत आयुक्त (रिलीफ कमिश्नर) यांच्या संपर्कात असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली आहे. अपघातावेळी ११० पर्यटकांच्या तीन बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात होत्या. त्यापैकी ४१ जण प्रवास करत असलेली बस नदीत कोसळली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT