जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एकोणावीस नगरपालिका व नगरपरिषदेचे आरक्षण आज जाहीर करण्यात आलेले आहेत यामध्ये मुख्य भुसावळ जामनेर कडे लक्ष लागून होते यामध्ये भुसावळ येथील महिला आरक्षण त्यांनी अनुसूचित जाती, जामनेर ओपन महिलांसाठी राखीव झालेली आहे.
राज्य सरकारने आज नगरपालिका नगरपरिषद यांचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील विचार केला असता. भुसावळ हे अनुसूचित जाती महिला राखीव झाले आहे यामुळे नामदार संजय सावकारे यांच्या पत्नीचा मार्ग नियुक्त नगराध्यक्ष पदासाठी खुला झालेला आहे तर दुसरीकडे जामनेर नगरपरिषद चे आरक्षण हे खुला प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाल्यामुळे नामदार गिरीश महाजन यांच्या पत्नी पुन्हा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असतील त्यामुळे भुसावळ जामनेर हे नामदारांच्या घरातच पदे जाणार आहे
तर दुसरीकडे अनुसूचित जाती महिलांसाठी भुसावळ
सावदा ओबीसी महिलेसाठी
चोपडा नशिराबाद खुला प्रवर्ग महिला
रावेर जामनेर यावल पाचोरा धरणगाव फैजपूर नगरपालिका महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे
जामनेर व भुसावळ या घरातलंच व्यक्तींना पद मिळणार असल्यामुळे किंवा त्यांच्या सौभाग्यवती मैदानात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झालेले असल्याने तालुका व त्यांची पती देवांच्या ताब्यात तर शहर पत्नीच्या ताब्यात अशी संकल्पना राबवण्यात आले तर दिसून येईल.