धुळ्यामध्ये साखळी उपोषणासाठी बसलेले मराठा बांधव Pudhari Photo
धुळे

धुळे येथे मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

धुळे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रविवारी (दि.22) धुळ्यामध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. शासनाच्या धोरणामुळे मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नसल्याने हे उपोषण केले जात असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे तसेच सगे सोयऱ्याचा लाभ देखील देण्यात यावा, या मागण्यांसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू होवून सहा दिवस उलटून गेले. तरीही राज्य शासनाने आरक्षणा संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. शासन वेळ काढू धोरण स्विकारत आहे. त्यामुळे धुळ्यातील जेल रोडवर सकल मराठा समाजाने निदर्शने केली. यावेळी झालेल्या निदर्शनात शासनाच्या मराठा विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. यावेळी सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, हरिचंद्र वाघ, राजेंद्र काळे, विकास बाबर, मनोज ढवळे,किशोर वाघ,दीपक रौंदळ, वैभव पाटील, गजानन गायकवाड, भास्कर मराठे,प्रसाद जाधव, राहुल गायकवाड, तुळशीराम मस्के, तुकाराम बागुल, संजय कावळे, सुनील ठाणगे, शेखर मराठे ,यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT