श्रीरामपूर : तालुक्यातील खैरी निमगाव येथील अक्षदा हिला कुदळीने डोक्यात मारून तिचा खुन केला, तसेच मुलगा शिवतेज यास आंब्याच्या झाडाला फाशी देवुन मारल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश नंबर 1 एस. एन. साळवे यांनी कलम 302 अन्वये बलराम दत्तात्रय कुदळे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली असल्याची माहिती सरकारी वकील पी.पी. गटणे व एस.ए. दिवेकर यांनी ही दिली.
अक्षदा प्रकाश बोरावके हिचा विवाह बलराम दत्तात्रय कुदळे याचे बरोबर 28 मे 2015 रोजी झालेला होता. अक्षदा नांदण्यास खैरी निमगाव येथे गेली. त्यानंतर त्यांना शिवतेज हा मुलगा झाला होता. बलराम त्याची पत्नी अक्षता हे वस्तीवर राहण्यास गेले. दि. 14 एप्रिल 2022 रोजी अक्षता हिचा भाऊ महेश बोरावके याच्या मोबाईलवर बलराम याने व्हिडीओ कॉल करत 7 वर्षाचा संसार झाला, एक मुलगा झाला, अजुन काय पाहिजे असू म्हणून तुला यायचे नाही का, मी तुझे भाच्याला व बहिणीला मारून टाकले असल्याचे सांगितले. त्यांनतर अक्षताचा भाऊ महेश याने श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनला फोन करून बलराम याने अक्षदा हिला कुदळीने डोक्यात मारून तिचा खुन केला, मुलगा शिवतेज यास फाशी देवुन मारले होते व हे फोटो त्याने व्हॉटसपवर पाठविले होते.
याप्रकरणी आरोपी बलराम विरुध्द त्याचे सासरे प्रकाश बोरावके यांनी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून आरोपी विरुध्द तपासी अधिकारी यांनी तपास करून दोषारोपपत्र सादर केले. सदर सेशन केस नंबर 37/2020 हि मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश नंबर 1 एस. एन. साळवे यांचे समोर सुरू झाली. त्यात सरकारी पक्षातर्फे पी.पी. गटणे व एस.ए. दिवेकर यांनी काम पाहिले. यात सरकारी पक्षातर्फे एकूण 15 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवीण्यात आल्या.
यात मयताचे वडील, मयताचा भाऊ, बहिण, पोलिस पाटिल, डॉक्टर व तपासी अधीकारी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात सरकारी पक्षातर्फे जे साक्षीदार तपासण्यात आले त्यावरून न्यायालयाने आरोपी बलराम याने त्याची पत्नी अक्षदा हिला डोक्यामध्ये कुदळ मारून तिचा खुन केला व मुलास झाडाला फाशी देवुन मारले हे धरून आरोपी दोषी आहे, असे सिध्द झाले आहे. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश नंबर 1 एस. एन. साळवे यांनी यामध्ये आरोपी बलराम कुदळे यास भादवी कलम 302 प्रमाणे दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याकामी सरकारी पक्षास पोलिस उपनिरीक्षक घाणे, व्हि.आर, सहायक फौजदार पठाण, बर्डे, ठोंबरे यांनी सहायय केले.