मुंबई

नालासोपारा येथे चिमुकल्याचे अपहरण

अनुराधा कोरवी

नालासोपारा : नालासोपारा रेल्वेस्थानकातून साडेतीन वर्षीय चिमुकल्याचे अपहरण झाल्याची घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली होती. त्या चिमुकल्याला तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या दिशेने जाताना दिसल्यानंतर डीसीपी संजयकुमार पाटील यांनी तत्काळ सूत्रे हलवून काही तासांच्या आत तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेने मुलाला शोधून काढत पालकांच्या स्वाधीन केले.

दरम्यान अपहरण करणार्‍या दाम्पत्याला वसई रोड लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. चिमुकल्याला खाऊ देवून आपल्या घरी नेले. मात्र अपहरणाचा आपला उद्देश नव्हता असे त्या दांम्पत्याने पोलिसांना सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT