कोडीन औषधांची तस्करीप्रकरणी तिघांना मुंबई युनिटच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्यांनी अटक केली. एस. आर अहमद, एम. अस्लम आणि वाय खान अशी या तिघांची नावे आहेत. या कारवाईत या अधिकार्यांनी सुमारे पंधरा लाख रुपयांचा तीन हजार कोडीन औषधांच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. अटकेनंतर या तिघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना एनसीबी कोठडी सुनावली आहे.
मुंबई शहरात कोडीन औषधांची तस्करी करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई युनिटला माहिती मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने या टोळीची माहिती काढून उल्हासनगर येथून तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी त्यांच्याकडून या अधिकार्यांनी तीन हजार कोडीनच्या बाटल्या जप्त केल्या. त्याची किंमत सुमारे पंधरा लाख रुपये आहे. याच गुन्ह्यांत नंतर एस. अहमद, एम अस्लम आणि वाय खान या तिघांना या अधिकार्यांनी अटक केली.
चौकशीत त्यांनी हा साठा उत्तरप्रदेशातून आणला होता. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय कोडीन औषध विकले जात नाही. त्यामुळे ही टोळी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातील झोपडपट्टीमध्ये या कोडीनची विक्री करत होते. काही तरुण ड्रग्ज म्हणून कोडीनचा वापर करतात. त्यांना ते कोडीनच्या बाटल्या कोणी दिले, कोणत्या कंपनीकडून त्यांनी हा साठा घेतला होता याचा एनसीबीचे अधिकारी तपास करत आहे. या गुन्ह्यांत त्यांच्या इतर काही सहकार्यांची नावे समोर आली आहे. त्यांच्या अटकेसाठी या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.