लैंगिक अत्याचारातील आरोपीचा जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला. File Photo
मुंबई

मुंबई : लैंगिक अत्याचारातील आरोपीचा 'जेजे' मध्ये मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अटक केलेल्या आरिफ मेहबूब कुरेशी या आरोपीचा जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला. पोलिसांनी जबर मारहाण केल्यामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड गदारोळ केला. सुरुवातीला त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यासही नकार दिला.

शिवडी येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरिफवर आरोप आहे. गेले नऊ महिने आरोपी तिचा सातत्याने पाठलाग करत होता. फोन करून अश्लील बोलणे, आणि मेसेजही करत असल्याने कंटाळून शेवटी तिने आपल्या घरी हा प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला १६ सप्टेंबरला अटक केली.

सुरुवातीला त्याला काही दिवस पोलीस कस्टडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली. आरिफला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर २२ सप्टेंबर रोजी त्याला आर्थररोड कारागृहात आणले गेले. मात्र फिटचा त्रास झाल्याने त्याला २२ सप्टेंबरलाच जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी आरिफचा मृत्यू झाला. आरिफ अंमलीपदार्थांचे सतत सेवन करत होता, असे काळाचौकी पोलिसांचे म्हणणे आहे.

मोठ्या संख्येने आलेल्या नातेवाइकांकडून रुग्णालयात गोंधळ

मृत्यूची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक मोठ्या संख्येने दुपारी जे. जे. रुग्णालय गोळा झाले. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे अरिफचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे यांचा मृतदेहही शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात आणला होता. गोंधळ घालणारे नातेवाईक त्याचेच असावेत, अशी चर्चा सुरू झाल्यानंतर प्रसाद माध्यमांचे प्रतिनिधीही त्या ठिकाणी तातडीने जमले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT