Mumbai Water Cut: पाणी कपातीचा फटका! या भागांमध्ये पाणीटंचाई Pudhari Photo
मुंबई

Mumbai Water Cut: पाणी कपातीचा फटका! या भागांमध्ये पाणीटंचाई

पिसे, पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत मीटर अद्ययावतीकरण कामासाठी मंगळवारपासून गुरुवारपर्यंत 10 टक्के पाणीकपात करण्यात आली

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पिसे, पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत मीटर अद्ययावतीकरण कामासाठी मंगळवारपासून गुरुवारपर्यंत 10 टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी या कपातीचा मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. दक्षिण मध्य मुंबईसह पूर्व उपनगरांत कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्यामुळे पाण्याची मोठी कमतरता भासली.

जलशुद्धीकरण केंद्रातील 100 किलोवॅट विद्युत केंद्रामधील विद्युत मीटर अद्ययावत करणे व मीटर जोडणीची कामे या काळात दुपारी 12.30 ते 3.00 वाजेपर्यंत म्हणजेच अडीच तास केली जाणार आहेत. मंगळवारी पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासली. त्यामुळे काही भागात टँकर मागवण्यात आले होते. बुधवार व गुरुवारीही पाणीटंचाई राहणार असल्यामुळे नागरिकांनी जपून व साठवून पाणी वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

या विभागात पाणीटंचाई

ए विभाग - नरिमन पॉईंट, कुलाबा, फोर्ट

बी विभाग - क्रॉफर्ड मार्केट, मोहम्मद अली रोड, पायधुनी, भेंडीबाजार

ई विभाग - नागपाडा, आग्रीपाडा, भायखळा, माझगाव, राणीबाग परिसर

एफ दक्षिण विभाग - परळ, लालबाग, काळाचौकी, शिवडी, वडाळा

एफ उत्तर विभाग - माटुंगा, सायन, अँटॉप हिल

पूर्व उपनगर

एल विभाग- कुर्ला पूर्व क्षेत्र सर्व

एम पूर्व विभाग - गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द, बैंगनवाडी

एम पश्चिम विभाग - चेंबूर आजूबाजूचा परिसर

एन विभाग - विक्रोळी, घाटकोपर पूर्व, घाटकोपर

एस विभाग - भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व क्षेत्र

टी विभाग - मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT