मुंबई : ना युती, ना आघाडी; आगामी विधानसभा निवडणुकांना आपण स्वतंत्रपणे सामोरे जाणार आहोत. तसेच निकालानंतर मनसे हा सत्तेतील पक्ष असेल हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी स्वबळाचा नारा दिला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेर येत नाहीत, असा घणाघात केला.
मुंबईतील नेस्को येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्याला रविवारी राज ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे हे इतिहासातून बाहेर येत नाहीत. सतत वाघनखे काढतात. इथून अफजल आला, शाहिस्तेखान आला, असे सुरू आहे. अरे महाराष्ट्राबद्दल बोला, असा टोला त्यांनी लगावला.