‌BBA BCA Admission | ‘बीबीए-बीसीए‌’च्या निम्म्यापेक्षा जास्त जागा रिक्त Pudhari File Photo
मुंबई

‌BBA BCA Admission | ‘बीबीए-बीसीए‌’च्या निम्म्यापेक्षा जास्त जागा रिक्त

1.5 लाखांपैकी 36 हजार जागांवरच प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : बीबीए-बीसीए-बीएमएस व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या गतवर्षीप्रमाणे यंदाही दोन वेळा प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतल्याने झालेल्या विलंबाचा फटका प्रवेशावर झालेला दिसून येत आहे. बीबीए-बीसीए-बीएमएसच्या तिसऱ्या फेरीदरम्यान फक्त 36 हजार 812 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे 68 हजार 249 म्हणजेच तब्बल 64.96 टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

दोन वेळा घेण्यात आली सीईटी

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) आदेशानंतर राज्यातील बीबीए-बीसीए अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी) राबवण्यास गेल्या वर्षीपासून सुरुवात झाली. गेल्या वर्षी आयत्या वेळी झालेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून दोन वेळा परीक्षा घेण्यात आली. यंदाही विद्यार्थी-पालक आणि प्रामुख्याने संस्थाचालकांच्या मागणीमुळे दोन सीईटी घेण्यात आली.

महत्त्वाचे मुद्दे

दोनवेळा सीईटीमुळे प्रवेश प्रक्रिया विलंबली

एकूण 1.05 लाख जागांपैकी फक्त 36,812 प्रवेश

तब्बल 64.96 टक्के जागा रिक्त राहिल्या

बीसीए-एमसीए इंटिग्रेटेडमध्ये 64.89 टक्के जागा रिक्त

बीबीए-बीएमएसमध्ये

65 टक्के जागा रिक्त

बीएमएसऐवजी ‌‘बीकॉम इन मॅनेजमेंट स्टडीज‌’ सुरू केल्याचा परिणाम

विद्यार्थ्यांचा कल पर्यायी अभ्यासक्रमांकडे वळला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT