विमानतळाच्या हेल्पडेस्कवर शिवाजी महाराजांचे नाव वरच्या स्थानावर  Pudhari
मुंबई

विमानतळाच्या हेल्पडेस्कवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव अखेर वरच्या स्थानावर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील अदानी व्यवस्थापन कार्यालयातील हेल्पडेस्कच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या उल्लेखामुळे शिवप्रेमीमध्ये नाराजी पसरली होती, याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या दणक्यानंतर अदानी प्रशासनाने हेल्पडेकच्या वरच्या स्थानावर सन्मानपुर्वक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव टाकले.

येथील अदानी व्यवस्थापनाच्या कार्यालयातील हेल्प डेकच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख होता. त्याबाबत शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाने वाहतूक सेनेच्या वतीने अध्यक्ष उदय दळवी यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस सूर्यकांत तांडेल, कार्याध्यक्ष अशोक तावरे, उपाध्यक्ष प्रमोद सावंत, साई कुमार माळोदे, नारायण पवार, चिटणीस धर्मेश राठोड, अभिजीत सारंगे व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अदानी प्रशासनाला धारेवर धरले होते. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख योग्य पद्धतीने केल्याबाबत अध्यक्ष उदय दळवी व चिटणीस धर्मेश राठोड यांनी पाहणी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT