गुड न्यूज ! महाराष्ट्रातील 'या' तीन शहरात उभे राहणार AI सेंटर्स, मुख्यमंत्र्यांची घोषणा CMO 'X'
मुंबई

गुड न्यूज ! महाराष्ट्रातील 'या' तीन शहरात उभे राहणार AI सेंटर्स, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Government IBM Agreement| IBM व राज्य सरकारमध्ये महत्त्वाचा करार

मोनिका क्षीरसागर

AI Centers in maharashtra

मुंबई : महाराष्ट्र सरकार आणि आयबीएम टेक्नॉलॉजीमध्ये मंगळवारी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या एक्स (CMO-X) अकाऊंटवरून पोस्ट करत दिली आहे.

CMO ने केलेल्या एक्स (X) पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी (इंडिया) यांच्यामध्ये एआयद्वारे प्रशासनिक परिवर्तनासाठी सामंजस्य करार करण्यात आला. याद्वारे महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर 'या' प्रमुख शहरांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केंद्र उभारण्यात येणार आहेत".

पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी (इंडिया) यांच्यामध्ये AI द्वारे प्रशासनिक परिवर्तनासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), हायब्रिड क्लाऊड, डेटा अ‍ॅनालिटिक्स, सायबर सुरक्षा आणि ऑटोमेशनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा उपयोग करून सार्वजनिक सेवा वितरण आणि प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करणे आहे.

या करारानुसार, राज्यात 3 कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केंद्रे उभारण्यात येणार आहेत ते पुढीलप्रमाणे;

AI कौशल्य व उत्कृष्टता केंद्रांची निर्मिती

मुंबई - भौगोलिक विश्लेषण

पुणे - न्यायवैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधा

नागपूर - प्रगत AI संशोधन आणि MARVEL अंमलबजावणी तंत्रज्ञान

यावेळी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री ॲड. आशिष शेलार, IBM इंडिया आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पटेल, मुख्य सचिव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT