मराठवाडा

निलंगा : केसिंग कापताना मातीचा ढिगारा कोसळला; दोन शेतकऱ्यांचा गुदमरुन मृत्यू

backup backup

निलंगा; पुढारी वृतसेवा : बोअर भोवती खोदलेल्या खड्डयात उतरुन केसिंग कापत असताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळ्याने  गुदमरुन दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा शिवारात मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. योगेश उर्फ बंडू सतिश जाधव (वय ३५) व बसवराज बाळाजी गड्डे पाटील (वय ४०) अशी मृत पावलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

शेतकरी योगेश उर्फ बंडू सतिश जाधव यांच्या शेतात बोअरचे घेण्यात आले होते. ते कोरडे पडले होते. त्यात मोटारही अडकली होती . बोअरमधील मोटार व केसिंग काढण्यासाठी त्या बोअरभोवती जोसीबीने २० फुट खड्डा खोदण्यात आला होता. काळी माती खूप होती. केसिंग कापण्यासाठी दोन्ही शेतकरी खड्ड्यात उतरले होते व ते केसिंग कापत असताना मातीचा ढिगारा त्यांच्या अंगावर पडला. दरम्यान तेथील शेतकऱ्यांनी मातीच्या ढिगारा हटवला व उपचारार्थ त्यांना प्रारंभी अंबुलगा (बु.) येथील प्राथमिकआरोग्य केंद्रात त्यांना निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे तपासनीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT