बाळाची गळा घोटून हत्या Pudhari File Photo
नांदेड

नांदेड : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाची गळा घोटून हत्या

पुढारी वृत्तसेवा

देगलूर : देगलूर शहरातील फुले नगर येथील रहिवासी असलेलल्या जोडप्यातील अनैतिक संबंधातून जन्मालेल्या पंचवीस दिवसांच्या बाळाचे गळा घोटून निघृपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने देगलूरात एकच खळबळ उडाली आहे.

चुलत दिराशी अनैतिक संबंध

यासंदर्भात पोलांसकडून मिळालेल्या माहिती अशी की, मुळ चाकुर (ता. देगलूर) येथील रहिवासी असलेलल्या व सध्या फुले नगर येथे वास्तव्यास असलेल्या महिलेचा पती दोन वर्षांपूर्वी मरण पावला होता. त्या दोघांना एक सहा वर्षांची मुलगी व एक चार वर्षांचा मुलगा असे दोन अपत्ये होती. दरम्यानच्या काळात नात्याने चुलत दिर असणाऱ्या शेषेराव सुदाम भुरे (वय ३७) याच्याशी सुत जुळले. यामधून ती गर्भवती झाली. शेषेराव याला ते बाळ नको होते. या कारणाने तो नेहमीच म्हणत होता की ‘हे बाळ नको आहे मी कीती मुलांचे पालनपोषण करू. या कारणावरून त्या दोघांत सतत भांडण होत होते. मात्र ते सर्व सहन करत होती. दि. ११ जुलै रोजी उप जिल्हा रूग्णालय देगलूर येथे रात्री ९.०० वाजता तिने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिला रूग्णालयातून तीन दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. ती आपल्या तीन मुलांसह फुलेनगर येथे रहायला गेली. मात्र शेषेराव त्या मुलीला जन्म दिल्या पासून रोज संपवण्याची भाषा करत होता. सदरील महिला सतत विरोध करत राहिली.

जन्मलेल्या बाळाचा गळा दाबला

दि.३ ऑगस्ट रोजी रात्री २.३० वाजता तीची मोठी मुलगी रडत असल्याचा आवाज आल्याने सदर महिला जागी झाली आणि पाहते तर शेषराव भुरे हा पंचवीस दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा गळा दाबत होता. तेव्हा त्याच्या कडून बाळा हिसकावून घेत बाळाला दुध पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कसलीच हालचाल करत नव्हती हे तिच्या लक्षात आले. ते बाळ तिच्याकडून हिसकावून घेवून शेषराव भुरे याने त्या बाळाचा मृतदेह एका पिशवित घालून बाहेर कोठेतरी फेकून सकाळी ६.०० वाजता घरी परतला. दरम्यान दि. ५ ऑगस्ट रोजी एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना कळविले. त्यावरून पोलिसांनी थेट आरोपीच्या घरी जावून बाळाची फोटो दाखवून सदरची महीती विचारली असता फिर्यादी महिलेने माझीच मुलगी असल्याचे सांगून शेषराव भुरे विरूद्ध देगलूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादिवरून शेषराववर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला तात्काळ शेषरावला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंझारे हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT