लोहा मतदारसंघात पहिल्‍या दिवशी एकही अर्ज दाखल नाही  Pudhari Photo
नांदेड

लोहा मतदारसंघात पहिल्‍या दिवशी एकही अर्ज दाखल नाही

Maharashtra Assembly Polls | २१ जणांनी ५३ अर्ज घेतले

पुढारी वृत्तसेवा

लोहा : विधानसभा मतदार संघात पहिल्‍या दिवशी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही. पण २१ जणांनी ५३ नामनिर्देशन पत्रे घेतली आहेत. अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी अरूणा संगेवार यांनी दिली. विधानसभा निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन दाखल करण्‍यास आज पासून प्रारंभ झाला आहे. सुट्टीचे दिवस वगळता २९ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ३० ऑक्‍टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी तर ४ नोंव्‍हेबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्‍याची अंतिम मुदत आहे. मतदान २० नोंव्‍हेबर रोजी होणार आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्‍या निर्देशांचे पालन व्‍हावे. यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडावी. अशा सुचना निवडणूक निर्णय अधिकारी अरूणा संगेवार यांनी दिल्‍या आहेत. सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार विठ्ठल परळीकर, तहसिलदार,कंधार रामेश्‍वर गोरे, नायब तहसिलदार उर्मिला कुलकर्णी, रेखा चामनर, संदीप हाडगे, अशोक मोकले, राजेश पाठक,राजेश गायंगी, सहाय्यक महूसल अधिकारी, श्रिनिवास ढगे,हरिराम राऊत,तिरूपती मुंगरे, ईश्‍वर धुळगंडे, मन्‍मथ थोटे, अशोक मोरे, महेंद्र कांबळे, बी.बी.शेख, विलास चव्हाण, सूर्यकांत पांचाळ, दयानंद मळगे, मुनींत गायकवाड यांसह कर्मचारी निवडणूक प्रक्रिया व्‍यवस्थित पार पाडण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहेत.

२१ जणांनी ५३ अर्ज घेतले

पहिल्‍याच दिवशी २१ जणांना ५३ अर्जांची विक्री झाली आहे. माजी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.श्‍यामसुंदर शिंदे, प्रविण पाटील चिखलीकर, प्रा.मनोहर धोंडे, एकनाथ पवार, शिवा नंरगले, रंगनाथ भुजबळ, आशाताई शिंदे, रामचंद्र येईलवाड, सतिश पाटील उमरेकर या प्रमुख उमेदवारांचा यात समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT