... Finally, Mahavitaran appoints an assistant engineer
किशोर पैठणपगारे
शिऊर महावितरण : कार्यालयातील दीड वर्षांपासून रिक्त असलेले सहायक अभियंतापद दै. पुढारीच्या बातमीनंतर ५ जुलै रोजी भरण्यात आले. सहायक अभियंता नीलेश ओहोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिसरातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती अभियंता ओहळ यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.
वैजापूर तालुक्यातील शिऊर परिसरातील नागरिक दीड वर्षापासून महावितरणच्या अकार्यक्षमतेमुळे त्रस्त होते. सततच्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमुळे शेतकरी, लघुउद्योग व सामान्य जनतेवर परिणाम होत होता. १२ जून रोजी झालेल्या वादळी पावसात संपूर्ण गाव रात्रभर अंधारात होते.
यावेळी कोणतीही तत्काळ उपाययोजना महावितरणकडून न झाल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली होती. १५ जून रोजी दैनिक पुढारीने शिऊर परिसरात रात्रभर वीज गुल महावितरणचा गलथान कारभार उघड दीड वर्षांपासून महत्त्वाचे पद रिक्त या मथळ्याखाली तिखट शब्दांत महावितरणच्या हलगर्जी कारभारावर प्रकाश टाकला होता.
या वृत्ताची महावितरण प्रशासनाने दखल घेत, अखेर शिऊर महावितरण कार्यालयातील दीड वर्षांपासून रिक्त असलेले सहायक अभियंता पद ५ जुलै रोजी भरले गेले असून सहायक अभियंता नीलेश ओहोळ यांची नियुक्ती करण्यात आली आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
66 शिऊरमध्ये माझी पोस्टिंग झाल्याचा मला आनंद आहे. येथील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवणे ही माझी प्राथमिकता असेल.- नीलेश ओहोळ, सहायक अभियंता.