मनोज जरांगे-पाटील 
जालना

जरांगे पाटलांची प्रकृती अधिकच खालावली; भोवळ येऊन खाली बसले

पुढारी वृत्तसेवा

वडीगोद्री : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आज (दि.२०) चौथा दिवस असून त्यांची प्रकृती अधिकच खालवली आहे. व्यासपीठावरून उठून स्वच्छतागृहात जात असताना त्यांना अचानक भोवळ आल्याने ते खाली बसले. त्यांना नीट उभेही राहता येत नसल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना स्वच्छतागृहात नेले.

आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून डॉक्टरांनी त्यांना आशक्तपणा आला असून त्यांचा बीपी कमी झाल्याचे सांगितले. व त्यांना उपचाराची गरज असल्याचे सांगितले, मात्र जरांगेंनी उपचार घेण्यास नकार देत आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आशक्तपणामुळे त्यांना नीट उभे राहता येत नसल्याने त्यांची अवस्था पाहून मराठा कार्यकर्त्यांचे डोळ पाणावल्याचे दिसून आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT