मनोज जरांगे-पाटील  Pudhari File Photo
जालना

समाजासाठी लढायला मी पुन्हा तयार : मनोज जरांगे-पाटील

पुढारी वृत्तसेवा

वडीगोद्री पुढारी वृत्तसेवा : माझ्या समाजासाठी लढायला पुन्हा मी तयार आहे. मध्यंतरी उपोषण स्थगित केले होते. मात्र, सोमवार (दि.16) सप्टेंबरच्या मध्यरात्री पासून मी उपोषणार असल्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वसंध्ये पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. सध्या शेतीच्या कामाचे दिवस असल्याने आपले काम धंदे सोडून अंतरवाली सराटीत येऊ नये असे आव्हान त्यांनी समाजाला केले आहे.

‘काही आमदार थेट मराठ्यांत फूट पाडत आहेत, त्यांचे येत्या निवडणूकीत काय होते ते आता पहाच जरांगे यांचा इशारा दिला आहे. ते पुढे सरकारला उद्देशून म्हणाले की, समाजाच्या लेकरांना न्याय मिळण्यासाठी तुम्ही आरक्षण द्या. आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. पण तु्म्ही आरक्षण नका देऊ मग मराठ्यांची मस्ती आणि माज काय आहे हे तुम्हाला कळेल असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, तुम्ही आरक्षण मिळायच्या आधी ईडब्लूएस मधून मुलांनी फॉर्म भराला होता. त्याच वेळी सांगायचे ना तु्म्ही ईडब्ल्यूएस घेऊ नका, देवेंद्र फडणवीस का आमच्या मराठ्यांच्या पोरांचं नुकसान करायला लागले आहेत असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. दरेकर साहेब विरोधात बोलले आहेत. ते ठीक आहे पण काही आमदार थेट मराठ्यांत फूट पाडायला लागले आहेत. त्या आमदाराचं येत्या इलेक्शनला काय होते ते आता पहाच असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT