Absconding accused arrested, action taken by local crime branch
जालना, पुढारी वृत्तसेवा दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आर-ोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव येथून ताब्यात घेत मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई रविवार दि. २६ रोजी करण्यात आली. त्याच्या बरोबरच गावठी पिस्टलची अवैधरीत्या खरेदी करणाऱ्यास देखील पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. फरार आरोपीचे नाव लक्ष्मण गोरे असे नाव असून त्याच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, आरोपी लक्ष्मण गोरे हा मागील दोन महिन्यांपासून फरार होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण द्वारे तपास केला असता आरोपी गोरे हा जळगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी गोरे यास जळगाव येथून ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात घराचे नुकसान करुन जिवे मारण्याची धमकी व जाफराबाद येथील एका व्यक्तीला मारहाण करुन, शिवीगाळ व धमकी दिल्याबद्दल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मयत गजानन तौर याची बदनाम करण्याच्या उद्देशाने पोस्ट पाठविल्या प्रकरणी देखील त्याच्याविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त
आरोपी लक्ष्मण गोरे याने गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे हे आतिष प्रकाश पाटोळे रा. पिवळाबंगला, जालना यास विकले असल्याचे सांगितले. आतिष प्रकाश पाटोळे यास दि. २५ रोजी पाठक मंगल कार्यालय, जालना येथुन ताब्यात घेतले. त्याकडे रु. ३० हजार २०० रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुस मिळुन आले. पोलिसांनी गावठी कट्टा जप्त केला आहे.