औंढा नागनाथ(हिंगोली), पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ येथील नगरपंचायतच्या बेजबाबदार कारभाराला कंटाळून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यासाठी शुक्रवारी (दि.18) दुपारी टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. शहरातील घरकुल स्वच्छता आणि नागरिकांच्या कामाला होणारा विलंब याला कंटाळून हे आंदोलन करण्यात आले.
प्रधानमंत्री आवास घरकुल योजना, रमाई घरकुल योजना आदी लाभार्थ्यांच्या घरकुलाची थकीत रक्कम लाभधारकांनी घरकुल बांधूनही मिळत नाही. तसेच गावातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्याचप्रमाणे नगरपंचायतमध्ये चाललेल्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
मोहम्मद मुस्ताक यांनी नगरपंचायतला आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यापूर्वी नगरपंचायत प्रशासनाने दबाव तंत्र वापरून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल जेलमध्ये पाठवले होते. नगरपंचायतकडून आंदोलन कर्त्यांकडून विजय महामुनी, अनिल नागरे नगरपरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैजनाथ भालेराव यांच्या अनुपस्थितीत निवेदन स्वीकारले.
घरकुल लाभार्थकांना लवकरात लवकर झालेल्या कामाचा मोबदला देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. इनामी जमिनीवर गेल्या वीस पंचवीस वर्षापासून रहात असलेल्या सर्व नागरिकांना घरकुल मंजूर करून लाभ देण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
हेही वाचा