Many established members of Dharashiv Zilla Parishad are 'Out!' this year
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद `ची गटनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आज अनेकांना फटका बसला तर काही गटांमध्ये राजकीय नेत्यांना लॉटरी लागणार हे स्पष्ट आहे. सोमवारी झालेल्या आरक्षण सोडतीत अनेक प्रस्थापित नेत्यांना घरी बसावे लागणार हे स्पष्ट झाले असून यंदा नवीन चेहऱ्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेत होण्याची चिन्हे आहेत.
जिल्हाधिकारी कौर्तीकिरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आजची आरक्षण सोडत जाहीर झाली. यात इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेले गट असे वालवड महिला, उपळा, काटगाव, शिराढोण, काटी महिला, येणेगूर महिला, पळसप, येडशी, मोहा महिला, लोणी महिला, मंगरुळ (क), पाथरूड, तुरोरी महिला, सुकटा महिला.
अनुसूचित जाती महिलांसाठी बडगाव, सिंदफळ, डिकसळ, येरमाळा, सास्तूर हे गट आरक्षित झाले तर अनुसूचित जातीसाठी सांजा, काक्रंबा, खामसवाडी शहापूर हे गट राखीव झाले. अनुसूचित जमातीसाठी ढोकी गट राखीव झाला आहे. सर्वसाधारण खुले गट असे बलसूर-महिला, नंदगाव, आष्टा, डॉजा नायगाव, जेवळी महिला, कुन्हाळी महिला, कदेर महिला, माकणी महिला, अनाळा महिला, गुंजोटी, मंगरूळ (तु)-महिला, पाडोळी, तेर महिला, तेरखेडा, अणदूर, इटकूर, जवळा (नि), दाळिंब, ईट महिला, कानेगाव- महिला, आलूर, कवठा, केशेगाव महिला, जळकोट महिला, पारा महिला, बेंबळी, पारगाव महिला, कोंड महिला, अंबेजवळगा महिला, शेळगाव,
यंदाच्या आरक्षण सोडतीनंतर अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. अनेक महिन्यांपासून तयार करत असलेल्या काही ताकदवर नेत्याचा गट अन्य प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्यांची गोची झाली आहे. तर काही हाताच्या बोटावर मोजता येण्याइतपत नेत्यांचा गट खुला राहिला आहे. त्यामुळेच यंदाच्या आरक्षण सोडतीचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक प्रस्थापित नेत्यांना यंदा सभागृहात एंट्री करणे अवघड जाणार आहे. किंबहुना त्यांच्या वाट बिकट असणार आहे.