Soygaon, Khultabad are reserved for OBC, while Vaijapur is reserved for SC.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील नऊ पंचायत समितींच्या सभापतीपदासाठी गुरुवारी (दि.१६) आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानुसार सोयगाव आणि खुलताबादचे पद ओबीसींसाठी, तर वैजापूरचे सभापतीपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. उर्वरित सहा पदे ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात दुपारी ही सोडत पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विभागाच्या संगीता राठोड, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, तहसीलदार दिनेश झांपले यांची प्रमुख उपस्थिती होती. अनन्या चव्हाण या लहान मुलीच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्या काढण्यात आल्या.
सोडतीसाठी सर्व तालुक्यांतील नागरिकांनी गर्दी केली होती. वैजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये महिलांसाठी राखीव असणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सोयगाव आणि खुलताबाद या जागा आरक्षित असणार आहे. यातील खुलताबादची जागा महिलांसाठी आरक्षित झाली आहे.
सर्वसाधारण प्रवर्गामध्ये एकूण सहा पंचायत समितीचे सभापतीपदासाठी असून, यामध्ये फुलंब्री सर्वसाधारण प्रवर्ग, गंगापूर सर्वसाधारण, पैठण सर्वसाधारण महिला प्रवर्ग, सिल्लोड सर्वसाधारण महिला, कन्नड सर्वसाधारण महिला, छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणार आहे.