कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन प्रशासक मंडळाच्या चौकशीचे आदेश File Photo
छत्रपती संभाजीनगर

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन प्रशासक मंडळाच्या चौकशीचे आदेश

५.२८ कोटींचा गैरकारभार उघड : कृषी पणन विभागाकडून चौकशीसह वसुलीचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

Order of inquiry into the then Administrative Board of the Agricultural Produce Market Committee

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक तथा विद्यमान संचालक आणि त्यांच्या प्रशासक मंडळाच्या कारकीर्दीत ५ कोटी २८ लाख ५८ हजार रुपयांचा गैरकारभार झाल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या घोटाळ्याबाबत विद्यमान सभापती व संचालक मंडळाने कृषी पणन संचालकांकडे दाखल केलेल्या तक्रारीवरून दोषींची चौकशी करून रक्कम वसुलीचे आदेश विभागाचे उपसंचालक मोहन निवाळकर यांनी १५ ऑक्टोबर रोजी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीवर २०१९ मध्ये विद्यमान संचालक जगन्नाथ काळे यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी १७ मे २०१९ रोजीच्या सभेत जिन्सी येथील बाजार समितीच्या मालकीची जमीन २१ कोटी ७५ लाख रुपयांत विक्रीस ठेवण्यात आली होती. ही जमीन मशौर्य असोसिएट्सफ या कंपनीला लिलावाद्वारे विकण्यात आली. मात्र त्यातील ५ कोटी ६ लाख रुपयांच्या पोस्ट डेटेड चेकवर जमीन हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळे बाजार समितीला मोठा आर्थिक तोटा झाला.

जमिनीच्या ताब्याबाबतही अनियमितता झाल्याचे समोर येत आहे. दरम्यान या काळात सर्व व्यवहार मंजुरीशिवाय आणि नियमबाह्यरीत्या झाल्याची तक्रार विद्यामान सभापती राधाकिसन पठाडे यांच्यासह संचालक गणेश दहिहंडे, राम शेळके व शिवाजी वाघ यांनी शासनाकडे केली. गेल्या सहा वर्षांपासून बाजार समितीतील भ्रष्टाचार शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणत असून दोषींना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही केली आहे. त्यावरून कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ च्या कलम ५७ (४) व नियम १९९७ नुसार सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश उपसंचालकांनी दिले आहेत.

लिफ्ट प्रकरणातही लूटमार

एव्हरेस्ट स्केल याच कंपनीला करमाड उपबाजारपेठेतील लिफ्ट बसवण्यासाठी ४ लाख ४८ हजार रुपये देण्यात आले होते. मात्र, लिफ्ट न लावताच पैसे मात्र पूर्ण अदा झाले. हे सर्व व्यवहार मंजुरीशिवाय आणि नियमबाह्यरीत्या झाल्याचा ठपका विद्यमान संचालकांनी ठेवला आहे.

भुईकाटा न बसवताच अदा केले पैसे

करमाड उपबाजारपेठेतील भुईकाटा बसवण्यासाठी एव्हरेस्ट स्केल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला १७ लाख ६५ हजार रुपयांचे काम दिले, परंतु काम एक इंचही न होताच संपूर्ण रक्कम अदा करण्यात आली. रक्कम मिळताच कंपनीचे प्रतिनिधी फरार झाले. आजपर्यंत त्या ठिकाणी कोणताही भुईकाटा बसवलेला नाही, असे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व रक्कम व्याजासह वसूल करण्यात यावी ! शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा वाया जाऊ नये. गैरकारभार करणाऱ्या प्रशासक व त्यांच्या मंडळावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. सर्व रक्कम व्याजासह वसूल करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात कुणीही नियम मोडण्याचे धाडस करणार नाही
- राधाकिसन पठाडे, - राधाकिसन पठाडे, सभापती (भाजप)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT